पुणे, दि. 3 जानेवारी 2023
(चेकमेट टाईम्स): महापालिकेच्या वर्ग 1 ते 3 मधील
अधिकाऱ्यांना दरवर्षी आपल्या संपत्तीचे विवरण राज्य शासनाला सादर करणे बंधनकारक असते.
परंतु हे अधिकारी ते देण्यात टाळाटाळ करीत असल्याचे समोर आले आहे.
महापालिकेच्या वर्ग 1 ते 3 मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना
दरवर्षी आपल्या मालमत्तेचे (संपत्तीचे) विवरण महापालिका प्रशासनास सादर करणे राज्य
शासनाने बंधनकारक केले आहे. शासनाच्या आदेशानुसार 31 मे पूर्वी हे विवरणपत्र सादर
करणे आवश्यक आहे. मात्र सात महिने उलटूनही अधिकाऱ्यांना अद्याप विवरणपत्र सादर
केले नाही. अधिकाऱ्यांनी घेतलेल्या “झाकली मूठ सव्वा लाखाची’ या
भूमिकेमुळे अखेर कारवाईचा इशारा सामान्य प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
वर्ग 1 मध्ये महापालिकेत सुमारे 32 ते 35 अधिकारी असून, त्यात सर्व विभाग
प्रमुखांचा तसेच शासनाकडील उपायुक्तांचा समावेश आहे. मागील दोन वर्षे कोरोनाचे
कारण देत विवरणपत्र सादर करण्यास मुदतवाढ दिली जात होती. मात्र अजूनही विवरणपत्र
सादर करण्याची मुदत उलटून सात महिने झाली तरी अधिकारी विवरणपत्र सादर करत नसल्याने
अधिकाऱ्यांना संपत्तीचा हिशेब लागत नाही का, असा सवाल
उपस्थित केला जात असल्याचे दिसत आहे.
राज्य शासनाने 2014 पासून शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय
नोकरीत नियुक्तीच्या वेळी तसेच त्यानंतर दरवर्षी आपल्याकडील मालमत्तेचे विवरण सादर
करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाच्या या आदेशानुसार महापालिका प्रशासनानेही आपल्या
वर्ग 1 ते 3 च्या कर्मचाऱ्यांना शासन आदेशाप्रमाणे विवरणपत्र सादर करण्याचे आदेश
काढले आहेत. त्यानुसार दरवर्षी 31 मे पूर्वी हे विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
अद्यापही अनेक अधिकाऱ्यांची विवरणपत्र आली नसल्याने
सामान्य प्रशासन विभागाने पुन्हा एकदा तत्काळ विवरणपत्र सादर करण्याचे आदेश काढले
आहेत. तसेच ते सादर न केल्यास ही गैरवर्तणूक समजली जाणार असून, त्यानुसार कारवाई केली
जाणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी स्पष्ट केले.
तसेच अनेकदा अधिकारी आपल्या वरिष्ठांकडे ती सादर करतात. त्यामुळे आमच्या विभागात
येण्यास त्याला विलंब होत असल्याचेही इथापे यांनी स्पष्ट केले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84