पुणे, दि. 4
जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): बारामतीत आज माध्यमांशी
बोलतांना अजित पवार यांच्या संभाजी महाराजांच्या बाबतीतील वक्तव्यानंतर उदभवलेल्या
वादावर प्रश्न विचारला असता शरद पवार महाराजांचे या भूमीप्रती कार्य महत्वाचे आहे, त्यामुळे इतर
वाद करु नयेत असे ते म्हणाले.
छत्रपती संभाजी महाराजांप्रती आस्था
आहे अशा काही लोकांना ते धर्मवीर आहेत असे वाटले आणि काहींना ते स्वराज्यरक्षक
आहेत असे वाटले तरी त्यावरुन वाद करण्याचे काही कारण नाही, या भूमीचे रक्षण करण्यासाठी संभाजी
महाराजांनी प्राणांचे बलिदान केलेले आहे, त्यामुळे धर्मवीर
किंवा स्वराज्यरक्षक या भूमिकांवरुन वाद करु नये, अशी भूमिका
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडली.
.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.
नड्डा यांनी महाराष्ट्रात मिशन 45 ची घोषणा केली याबाबत विचारता पवार
म्हणाले, “मला खरंतर आश्चर्य वाटलं त्यांनी 48 ची घोषणा करायला हवी होती. त्यांच्या राज्यात निवडणूका झाल्या, सत्ता असूनही लोकांनी त्यांना सत्तेतून दूर केले. राज्याची केंद्राची
सत्ता असताना ज्यांना निवडणूक जिंकता आली नाही, त्यांच्या
वक्तव्याची नोंद किती गांभीर्याने घ्यावी याचा विचार करण्याची आवश्यकता नाही.”
नोटबंदीवर सर्वोच्च न्यायालयाने
निकाल दिलेला असल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नाही, न्यायालयाने
दिलेला निकाल आपल्याला मान्य करावा लागेल, इथून पुढच्या
काळात त्याचे अर्थकारणावर झालेले परिणाम व वेगळी मते, नंतर
पुढे येतील, असे ते म्हणाले.
महागाई, बेरोजगारी असे
मुद्दे मागे पडत आहेत, ज्या मुळे लोक अस्वस्थ आहेत, अशा विषयाला बाजूला ठेवून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सरकारकडून
होत आहेत. लव्हजिहाद प्रकरणी कायदे करण्याची मागणी होत आहे, पण
कायदे करणार कोण....केंद्र व राज्यातही भाजपचेच सरकार आहे, कायदा
करण्याची मागणी करण्यासाठी मोर्चे काढण्याची गरज काय आहे, सर्वांना
विश्वासात घेऊन भाजपने कायदा करुन मोकळे व्हावे, असेही ते
म्हणाले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84