पुणे, दि. 5 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): भारतीय रेल्वेतील सर्वांत वेगवान समजली जाणारी वंदे भारत देशातील महत्त्वाच्या स्थानकावरून धावत आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर स्थानकावरून नागपूर-बिलासपूर वंदे भारत सुरू झाल्यावर आता पुण्यातूनही धावणार असल्याचे निश्चित झाले आहे. या संदर्भात रेल्वे प्रशासनाने अधिकृत घोषणा केली नसली तरी त्या दृष्टीने मात्र प्रयत्न सुरु झाले आहेत.
पुण्यातून वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. नुकतेच यासाठी नेमलेल्या एका खासगी संस्थेने याचा अहवाल रेल्वे बोर्डाला सादर देखील केला आहे. पुणे विभागाच्या चालकांना वंदे भारत एक्स्प्रेस चालविण्याचे गाझियाबाद येथे प्रशिक्षण देखील सुरु झाले आहे. तर दुसरीकडे घोरपडीच्या कोचिंग डेपोमध्ये ‘वंदे भारत’साठी स्वतंत्र कव्हर्ड पीटलाइन देखील उभारली जाणार आहे.
अठरा दिवसांचे प्रशिक्षण पुणे रेल्वे विभागातील चालकांना गाझियाबाद येथे वंदे भारत एक्स्प्रेस चालविण्याचे १८ दिवसांचे प्रशिक्षण सुरु झाले आहे. चालकांच्या एका तुकडीचे हे प्रशिक्षण देखील पूर्ण झाले आहे. दुसरी तुकडीसुद्धा लवकरच जात आहे. ‘वंदे भारत’ एक्सप्रेसच्या कॅबमध्ये अनेक नवीन बदल केल्याने चालकांना प्रशिक्षण दिले जात आहे.
“पुण्यातील चालकांना वंदे भारत एक्स्प्रेस चालविण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. गाझियाबाद येथे एका तुकडीचे प्रशिक्षण देखील पूर्ण झाले आहे. या संदर्भात आवश्यक ती अन्य कामे देखील विभागात सुरु झाली आहे.” असे पुण्याचे वरिष्ठ विभागीय यांत्रिक व्यवस्थापक (परिचालन) ज्वेल मॅकेन्झी म्हणाले.
या वर्षात २५ ‘वंदे भारत’ धावतील रेल्वे मंत्रालयाने २०२३ या वर्षात देशातील विविध महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरून सुमारे २५ वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्याचा निर्धार केला आहे. यात पुण्यातून 2 रेल्वे सुरु होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. याचे मार्ग अद्याप ठरले नसले तरीही मिळालेल्या माहिती नुसार पुणे-सिकंदराबाद व मुंबई-पुणे-सोलापूर अशी धावण्याची दाट शक्यता आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84