पुणे, दि.10 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): वर्षाच्या सुरुवातीलाच आलेल्या अंगारकी चतुर्थी निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटे पासूनच गर्दी केली होती.
पहाटेपासूनच भाविकांची लांबच्या लांब रांग लागली होती. अंगारकी चतुर्थी निमित्त मंदिरावर फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती.
पहाटे 4 ते 6 या वेळात पंडित जितेंद्र अभ्यंकर आणि सहकाऱ्यांनी गायन सेवा बाप्पांच्या चरणी सादर केली. त्यांच्यासह भाग्यश्री अभ्यंकर, तनवी अभ्यंकर यांनी गायन केलं तर केदार परांजपे, निलेश देशपांडे, अपूर्व द्रविड आणि विशाल गंड्रतवार यांनी साथ संगत केली.रवींद्र खरे यांनी निवेदन केलं.
संकष्टी चतुर्थीचा उपवास पश्चिम आणि दक्षिण भारतात विशेषतः महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये पाळला जातो.
संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे. हे व्रत कोणीही करू शकते. हे व्रत दोन प्रकारांनी करतात. मिठाची संकष्ट चतुर्थी व पंचामृती चतुर्थी. या व्रतात दिवसभर उपवास करावा. उपवासानंतर चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा. त्यानंतरच भोजन करावे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84