Type Here to Get Search Results !

वारजे माळवाडी हद्दीतील आणखीन एका टोळीवर मोक्काची कारवाई; सिलसिला टू बि कंटिन्यूड

 



पुणे, दि.५ जानेवारी २०२३ (चेकमेट टाईम्स): पुणे शहराचे तत्कालीन आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहरात पाडलेला पायंडा पुढेही चालू असल्याचे दिसत असून, रितेश कुमार यांच्या पुणे शहरातील आगमनानंतर पहिली मोक्काची कारवाई वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार दि.२७ नोव्हेंबर २०२२ रोजी पप्या उर्फ वैभव उकरे व त्याचे ८ ते ९ साथीदार हे आकाशनगर जुना जकात नाका, वारजे पुणे येथील फिर्यादीच्या घरासमोर आले. यावेळी त्यांनी फिर्यादीच्या भावासोबत झालेला जुना वाद उकरून काढून, फिर्यादीस जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीचा जीव घेण्याच्या उद्देशाने मोठा दगड फिर्यादीच्या दिशेने मारला होता, मात्र त्यांनी तो दगड चुकवला. त्याचा राग येवून पप्या उर्फ वैभव उकरे याने तोच दगड फिर्यादीच्या मोटार सायकलवर परत मारून मोटारसायकलचे नुकसान केले.

 

तसेच पप्या उर्फ वैभव याचेबरोबर असलेल्या ८ ते ९ साथीदारांपैकी एकाने त्याच्या हातातील कोयता हवेत फिरवला व त्यांनी फिर्यादीच्या घरावर दगडफेक करून "पप्पुभाई हा इथला भाई आहे" असे म्हणुन "पप्पु भाईच्या नादाला लागाल तर एकेकाला खल्लास करून टाकेन" असे म्हणून परिसरात दहशत पसरविली व आरडा-ओरडा करत तेथून निघून गेले. याबाबत वैभव उकरे उर्फ पप्या तसेच त्याचे सोबत असणारे साथीदारांविरोधात फिर्यादीने कायदेशिर तक्रार दिल्याने वारजे माळवाडी पोलीस स्टेशन मध्ये भादवि कलम ३०७, ४२७.३३६, ३३७, ५०४, ५०६ (२), १४३, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट ४(२५) म.पो.का. क ३७ (१) (३)/१३५.क्रि. लॉ. अमे. अॅक्ट कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

 

सदर गुन्हयातील निष्पन्न आरोपी नामे (१) वैभव ऊर्फ पप्या शांताराम ऊकरे (वय २४ वर्षे, रा. दुर्गामाता मंदिरामागे, वडारवस्ती, कर्वेनगर, पुणे) (२) आशितोष नारायण साठे (वय १९ वर्षे, रा. मु.पो. कुळे, ता. मुळशी, जि. पुणे सध्या घर नं ३, चायनिज बिल्डींग, तीसरा मजला, कर्वेनगर, पुणे) आणि (३) गणेश उत्तम माने (वय २२ वर्षे, रा. विश्व कॉलनी, आकाशनगर, वारजे, पुणे) यांना अटक करण्यात आली असून, ते सद्या येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे आहेत. तसेच यावेळी त्यांच्या अल्पवयीन साथीदारांना देखील ताब्यात घेण्यात आले होते.

 

यातील अटक आरोपी यांचेकडे सखोल तपास केला असता, आरोपी नामे वैभव ऊर्फ पप्या शांताराम ऊकरे हा टोळी प्रमुख असून, हा प्रत्येक गुन्हयामध्ये काही सामाईक व काही नवीन साथीदारांना सोबत घेवून गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने, दाखल गुन्हयात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करणेबाबतचा प्रस्ताव वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके, यांनी परिमंडळ ३ चे पोलीस उप-आयुक्त सुहेल शर्मा यांचे मार्फतीने अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, यांना सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची छाननी केल्यानंतर आरोपी नामे वैभव ऊर्फ पप्या शांताराम ऊकरे याने आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयामध्ये काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.