पुणे, दि. 9 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): भारत पे स्कीममध्ये दर महिन्याला एक कोटी रुपयांचा व्यवहार (ट्रान्झॅक्शन) केल्यास एक तोळा सोने देण्याचे आमिष दाखवून काही व्यावसायिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
आरोपीने बऱ्याच व्यावसायिकांची फसवणूक केली असून, त्यापैकी चार व्यावसायिकांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. हा प्रकार २१ जून २०२२ पासून आतापर्यंत घडला आहे.
पोलिसांनी चेतन अनिल गादेकर (वय २७, रा. टिळेकरनगर, कोंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी येथील व्यावसायिकाने (वय २८) बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा अप्पर इंदिरानगर येथे व्यवसाय आहे. आरोपीने फिर्यादीला भारत पे स्कीममध्ये महिन्याला एक कोटी रुपयांचे ट्रान्झॅक्शन केल्यास एक तोळे सोने देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांच्याकडून ९ लाख ९ हजार रुपये घेतले. अशाच प्रकारे त्याने आणखी तिघांना आमिष दाखवून त्यांच्याकडून काही लाख रुपये घेतले. परंतु त्यांना एक रुपया न देता त्यांची फसवणूक केली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84