Type Here to Get Search Results !

खड्ड्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघाती मृत्यू प्रकरणी पुणे मनपा’ला १६ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश

 




पुणे, दि. 3 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): खड्ड्यामुळे दुचाकी घसरून अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना 16 लाख रुपये 16 टक्के व्याजासह नुकसान रुपये देण्याचा आदेश येथील दिवाणी न्यायाधीशांनी पुणे महानगरपालिकेला दिला आहे. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस.एस.शिंदे यांनी हा निकाल दिला.

 

यश दिनेश सोनी (वय 20) यांचा या अपघातात मृत्यू झाला होता. याबाबत त्यांचे वडील दिनेश फुलचंद सोनी (वय 52, रा.औरंगाबाद) यांनी पुणे महानगरपालिकेच्या विरोधात दिवाणी स्वरूपाचा दावा दाखल करत एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती.

 

घटना अश घडली कि, यश हे 26 जून 2016 रोजी त्याच्या दुचाकीवरून संचेती हॉस्पिटल चौकाकडून कामगार पुतळा चौकाकडे जात होते. शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारावर आले असता त्यांची दुचाकी एका मोठ्या खड्ड्यामुळे घसरली. अपघातानंतर घसरत गेल्याने डिव्हायडरजवळ असलेला दोन फुटांचा अर्धवट कापलेला लोखंडी रॉड यश यांच्या छातीला लागला. त्यामुळे या अपघातात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता.

 

सार्वजनिक रस्त्यांची योग्य देखभाल करून रस्ते सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिका आपली जबाबदारी पार पाडण्यास अपयशी ठरल्याने अर्धवट कापलेल्या लोखंडी रॉडमुळे यशचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, असा दावा सोनी यांनी केला होता.

 

तर यश हा निष्काळजीपणे व वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता दुचाकी चालवत होता. अतिवेगामुळे त्याचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले आणि त्याने लोखंडी सेपरेटरला धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला, असा दावा महापालिकेकडून करण्यात आला होता.

 

न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत काही पुढील निरीक्षणे नोंदविली. लोखंडी डिव्हायडर योग्य स्थितीत ठेवणे व त्याचा आकार योग्य ठेवणे व देखभाल ठेवणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे, संबंधित लोखंडी रॉड व लोखंडी सेपरेटर संबंधी महापालिकेने जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली नाही, महापालिकेच्या निष्कर्षीपणामुळे अपघात झाला आणि डिव्हायडरचा लोखंडी रॉड छातीला लागल्याने यश यांचा मृत्यू झाला.

 

महानगरपालिकेने सोनी यांच्या कुटुंबायांना 16 लाख 20 हजार रुपये नुकसान भरपाई आणि 15 हजार रुपये अंत्यविधीचा खर्च 16 टक्के व्याजासह दावा दाखल केल्याच्या तारखेपासून द्यावा, असा आदेश दिला.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes    

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_tim es/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes    

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84   


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.