पुणे, दि. 6 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): इंडियन लॉ सोसायटीतर्फे आयएलएस लॉ कॉलेजच्या मागे असलेल्या टेकडीवर सपाटीकरण करून टेनिस कोर्ट आणि फुटबॉलचे मैदान विकसित करण्यात येत आहे. या मैदानासंदर्भात पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
त्यामुळे हे काम तातडीने थांबविण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. एकात्मिक बांधकाम नियमावली (यूडीसीपीआर) अंतर्गत कलम 4.17 अन्वये हिलटॉप हिलस्लोपमधील कामाला स्थगिती दिली आहे. तसेच या लगतची सीमाभिंत त्वरित उतरवून घ्यावी अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.
या बांधकामामुळे टेकडीचे व जैवविविधतेचे नुकसान होणार असल्याने टेकडीप्रेमींनी त्यावर आक्षेप घेतला आहे तसेच या संदर्भात महापालिकेकडे तक्रारही केली होती. त्यानंतर महापालिकेच्या अधिकार्यांनी पाहणी केल्यानंतर हे काम हिलटॉप हिलस्लोपमध्ये विकसन करण्यात येत असल्याचे आढळले.
दरम्यान, हिलटॉप हिलस्लोप क्षेत्रात जागेच्या 0.4 जागेत बांधकामास परवानगी आहे. मात्र, आयएलएसतर्फे या क्रीडांगणाच्या कामाबाबत महापालिकेकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही, असे महापालिकेतील अधिकार्यांनी स्पष्ट केले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला
वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली
हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर
चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84