Type Here to Get Search Results !

पुणे महानगरपालिकेला केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून अनुदान मिळणार नाही; बसणार १० कोटी रुपयांचा भुर्दंड

 

पुणे, दि. 5 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): समान पाणी पुरवठा योजनेत समाविष्ट असलेल्या ११ टाक्यांना जागा न मिळाल्याने त्यांचे काम रद्द करण्यात आले होते. पण आता यापैकी चार टाक्यांना पर्यायी जागा मिळाल्याने त्यांचे काम केले जाणार आहे. पण या विलंबामुळे केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून ५० टक्के अनुदान मिळणार नसल्याने १० कोटी रुपयांचा भुर्दंड महापालिकेला सहन करावा लागणार आहे.

नवीन जलवाहिनी टाकण्यासह सर्व भागात समान पाणी देता यावे यासाठी ८२ टाक्यांचे नियोजन केले आहे. यासाठी २८२ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असून, त्यातील ५० टक्के रक्कम केंद्राच्या अमृत योजनेतून दिली जाणार आहे. २०१७ मध्ये या योजनेचे काम सुरू झाल्यानंतर आत्तापर्यंत ८२ पैकी ४२ टाक्यांची जागा मिळाल्याने त्या बांधून पूर्ण झाल्या आहेत तर २१ टाक्यांचे सप्टेंबर मध्ये, ८ टाक्यांचे मार्च २०२४ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. पण ११ टाक्यांच्या भूसंपादनाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

महापालिकेने या जागा ताब्यात याव्यात, पर्यायी जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू केले. पण त्यावर तोडगा निघालेला नाही. अखेर या टाक्या बांधणे शक्य नसल्याने या ११ ठिकाणी काम केले जाणार नाही, असे केंद्र सरकारला सांगून या टाक्यांचे ५० टक्के अनुदान घेतले नाही.

दरम्यान पाणी पुरवठा विभागाने धानोरी, वडगाव शेरी, विमाननगर येथे महापालिकेच्या शाळा, उद्यानाचे आरक्षण होते. यूडीसीपीआर या नियमावलीच्या आधारे आयुक्तांच्या अधिकारात आरक्षण बदलून टाक्यांसाठी पर्यायी जागा निर्माण केली. त्यानंतर तेथे बांधकाम करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली. त्यामध्ये धानोरी येथे शाळेच्या आरक्षणाच्या जागेवर २० लाख लिटरची टाकी बांधली जाईल. त्यासाठी ४.२९ कोटी खर्च येणार आहे.

वडगाव शेरी येथे जुने जलशुद्धीकरण केंद्र पाडून ३० लाख लिटरच्या दोन टाक्या बांधल्या जातील. त्यासाठी ८.७४ कोटी रुपये आणि विमाननगर येथील संजय पार्क येथे उद्यानाच्या जागेवर ४० लाख लिटरची टाकी बांधली जाईल. त्यासाठी ६.६९ कोटी रुपये खर्च येणार आहे. या खर्चास स्थायी समितीच्या मान्यतेसाठी प्रस्ताव ठेवला होता. त्यास प्रशासक तथा आयुक्त विक्रम कुमार यांनी मंजुरी दिली.


दृष्टीक्षेपात

१) धानोरी, वडगाव शेरी, विमाननगरला टाक्या बांधण्यासाठी स्थायीची १९ कोटी ७२ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता

२) महापालिकेने हाती घेतले २४५० कोटी रुपयांच्या समान पाणी पुरवठा योजनेचे काम

३) आत्तापर्यंत या योजनेसाठी ८९० कोटी रुपये खर्च करून ६० टक्के काम पूर्ण

जागा मिळाली तरी अनुदान नाही

समान पाणी पुरवठा योजनेमध्ये टाक्या बांधण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून ५० टक्के अनुदान मिळावे यासाठी प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार १४१ कोटी रुपये महापालिकेला मिळणार आहेत. पण ११ टाक्यांच्या जागा नसल्याने त्याबाबत केंद्र सरकारला कळविल्यानंतर त्याचे अनुदान रद्द झाले. पण आता चार टाक्यांसाठी जागा मिळाली असली तरी अनुदान मिळणार नाही. भविष्यात केंद्र सरकारने नवीन योजना आणली त्यातून मदत मिळावी यासाठी महापालिकेकडून प्रस्ताव पाठवला जाईल.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84     


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.