पुणे, दि. 11 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार घेत असलेला रुग्ण गरम पिशवीतील पाणी लिकेज होऊन गंभीररीत्या भाजल्याची घटना समोर आली आहे. कोरेगाव पार्क येथील इनलॅक्स ॲण्ड बुधराणी हॉस्पिटलमध्ये घडली. त्यावरून हॉस्पिटलमधील एका डॉक्टरसह नर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिरालाल सारवान (वय 70, रा. गजानन सोसायटी, दौंड) असे जखमी रुग्णाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिरालाल सारवान हे रेल्वे खात्यात जमादार पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. ४ जानेवारी 2023 रोजी त्यांचा रस्त्यावर अपघात झाला. त्यामुळे उपचार घेण्यासाठी ते दौंड रेल्वे रुग्णालयात दाखल झाले. सिटी स्कॅनमध्ये त्यांच्या डोक्यात रक्तस्त्राव झाल्याचे निदान झाल्याने त्यांना इनलॅक्स ॲण्ड बुधराणी हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून उपचारासाठी त्यांना आयसीयूमध्ये ठेवले होते. त्या रात्री त्यांचे कुटुंब मुक्कामासाठी नातेवाइकांकडे गेले.
दुसऱ्या दिवशी त्यांचा मुलगा आईसोबत वडिलांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेल्यावर त्यांना वडील बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांच्या पोटावर, हातावर आणि गुप्तांगावर भाजल्याच्या खुणा होत्या. याबाबत त्यांनी डॉ. महेश कुमार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी गरम पाण्याची पिशवी लिकेज झाल्याने रुग्णाला भाजल्याचे सांगितले.
याप्रकरणी त्यांचा मुलगा अॅड. सुरेश सारवान असे रुग्णाच्या मुलाचे नाव असून त्यांनी 9 जानेवारी 2023 रोजी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात त्यांच्या सहकारी वकिलांसोबत जाऊन घडलेला प्रकार सांगून डॉक्टर आणि नर्सविरोधात हलगर्जीपणा बाबतची फिर्याद दिली. त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84