Type Here to Get Search Results !

मोक्काच्या गुन्ह्यात २०१७ पासून गुंगारा देणाऱ्या जुलैखाबी जील्लोला धरण्यात पोलिसांना यश; अंमली पदार्थ तस्कर



पुणे, दि. 7 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): बेकायदेशीररित्या येरवडा परिसरात अंमली पदार्थाची विक्री करणार्‍या दोन तस्करांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक 1 ने बेड्या ठोकल्या.

अफजल इमाम नदाफ, अर्जुन विष्णु जाधव आणि जेलुखा मोहम्मद हुसेन कुरेशी उर्फ जुलैखाबी उर्फ जिल्लो (40, रा. सय्यद अलीव्ह, प्राभात कॉलनी, सांताक्रुझ, अंधेर, सध्या पुर्व मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तिघांनाही 9 जोनवारी 2023 पर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जानेवारी 2023 रोजी संगमवाडी ब्रिजवरून अफजल आणि अजुन या दोघांना मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ विकताना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर या तपास करत असताना अर्जुन जाधव हा 6 महिन्यापूर्वीच मोक्क्यातून जामीनावर सुटला होता.

तसेच अफजलकडे केलेल्या तपासात त्याने त्याला हा अंमली पदार्थ जेलुखा कुरेशीकडून मिळाला असल्याचे समजले. ती मुंबईतील सांताक्रुझ येथे राहत असल्याचे पोलीस हवालदार मारूती पारधी व मनोजकुमार साळुंके यांना कळाले.

तिच्यावर मुंबई येथे अंमली पदार्थ बाळगल्याचे दोन तर पुण्यात अंमली पदार्थ बाळगल्याच्या मोक्का प्रकरणात मोक्काचा खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात ती 2017 पासून फरार असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना कळविल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे यांनी आणि पथकातील कर्मचार्‍यांनी सांताक्रुझ येथे जाऊन महिलेचा शोध घेतला.

ही कारवाई पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर घोरपडे, विशाल दळवी, राहुल जोशी, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर यांच्या पथकाने केली.


दोघांना अमंली पदार्थाचा पुरवठा करणार्‍या आणि अमंली पदार्थ तस्करीत अग्रेसर आणि पुण्यातील मोक्काच्या गुन्ह्यात मागील 5 वर्षापासून फरार असलेल्या या सराईत महिला गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com 

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.