कडूस सोसायटीचे अध्यक्ष पंडित
नेहेरे यांनी आपआपसात ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त
झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी गुरुवारी (दि. 12 जानेवारी 2023) राजगुरुनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात
निवडणूक प्रक्रिया पार पडली.
सोसायटीच्या तेरा संचालकांपैकी
सात शिवसेनेचे; तर सहा राष्ट्रवादीचे आहेत. निवडणुकीच्या
पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या गटातील सर्व संचालक गेल्या दहा दिवसांपासून सहलीवर गेले
होते. यामुळे निवडणूक अटीतटीची आणि रंगतदार होणार, हे निश्चित
होते. निवडणूक प्रक्रियेत बारा संचालकांनी सहभाग नोंदवला. फक्कड पितांबरे हे
अनुपस्थित होते. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अशोक गारगोटे; तर शिवसेनेकडून राजेंद्र ढमाले व शंकर कावडे यांनी अर्ज भरले. यातील कावडे
यांचा निर्धारित वेळेनंतर अर्ज जमा झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण
झाले.
या गोंधळलेल्या वातावरणात व
निकालाची घोषणा करण्याअगोदरच, ‘आठ दिवसांनी निवडणूक घेऊ, अजेंडा पाठवून कळवू,’ अशी तोंडी सूचना अध्यासी
अधिकारी बगाटे यांनी दिली. त्यामुळे शिवसेनेच्या संचालकांसह त्यांचे सर्व समर्थक निघून
गेले. परंतु, ‘निवडणूक सभेचा कोरम पूर्ण झाला आहे. सभा रद्द
करण्याचे कारण नाही. असेल तो निकाल घोषित करा, त्यानंतरच
आम्ही कार्यालय सोडू,’ असा पवित्रा राष्ट्रवादीच्या पाचही
संचालकांनी घेतला.
या पेचातच ढमाले यांच्या उमेदवारी अर्जावर उमेदवार व अनुमोदकाची सही नसल्याच्या कारणाने; तर कावडे यांनी मुदतीच्या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याच्या कारणावरून अध्यासी अधिकारी एस. एम. बगाटे यांनी दोन्ही अर्ज बाद केले. अशोक गारगोटे यांचा एकमेव अर्ज वैध ठरल्याने त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे त्यांनी घोषित केले.
आमदार दिलीप मोहिते यांच्या
मार्गदर्शनाखाली उद्योजक अभी शेंडे व उद्योजक प्रताप ढमाले यांच्या प्रयत्नामुळे
तेरापैकी फक्त पाच संचालकांच्या जोरावर सोसायटीचा कारभार खेचून आणल्याने
राष्ट्रवादी समर्थकांनी गावात भंडाऱ्याची उधळण करीत वाजतगाजत मिरवणूक काढून जल्लोष
साजरा केला.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल
मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84