पुणे, दि. 9 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स):हैद्राबाद येथे पार पडलेल्या हिंद केसरी स्पर्धेमध्ये पुण्याच्या पैलवान ‘अभिजीत कटके’ने बाजी मारली. भारतीय कुस्तीतील सर्वात मानाची समजल्या जाणाऱ्या हिंद केसरी स्पर्धेत पुण्याच्या पैलवानने बाजी मारल्याने पुण्यात जल्लोष करण्यात आला. अभिजीतच्या विजयामुळे यंदाची मानाची हिंद केसरीची गदा महाराष्ट्राकडे आली आहे. अभिजीतने हरियाणाच्या पैलवानाला हरवलं.
या हिंद केसरी स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 8 जानेवारी 2023) खेळवण्यात आला. या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या अभिजीत कटकेने हरियाणाच्या सोमवीरला मात दिली. अभिजीतने ‘सोमवीर’ याला 4-0 अशा फरकाने पराभूत केलं.
या विजयानंतर अभिजीतवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी ट्विट करत "वा रे... पठ्ठ्या ! आपल्या वाघोलीचे सुपुत्र पैलवान अभिजित कटके हिंद केसरी किताबाचे मानकरी ठरले. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! "अशा शब्दात शुभेच्छा दिल्या.
अभिजीत कटकेने 2017 सालचा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. तसेच अभिजीत दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी तर एकदा महाराष्ट्र केसरी आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84