Type Here to Get Search Results !

केदारनाथ नंतर आता बद्रीनाथ मध्ये निसर्गाचे संकट; अनेक कुटुंबियांचे स्थलांतर

 

पुणे, दि. 7 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): चारधामपैकी एक बद्रिनाथचे प्रवेशद्वार असलेल्या जोशीमठ गावात अनेक ठिकाणी भूस्खलन होऊ लागल्याने गावातील रस्त्यांना गुरुवारपासून मोठमोठय़ा भेगा पडू लागल्या आहेत. त्यामुळे पाचशेहून अधिक घरांना तडे गेले आहेत.


घरे धोकादायक बनल्याने अनेक कुटुंबांना हाडे गोठवणाऱ्या थंडीत रात्र काढावी लागली. तेथील अतिधोकादायक घरांमध्ये राहणाऱ्या ५० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून ६०० कुटुंबांचे तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी शुक्रवारी रात्री दिले.

भूस्खलनानंतर जिल्हा प्रशासनाने बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) मार्फत केले जाणारे हेलांग वळण रस्त्याचे बांधकाम, तपोवन-विष्णुगड जलविद्युत प्रकल्पाचे काम आणि अन्य सर्व बांधकामांवर बंदी घातली आहे.


पुष्करसिंग धामी म्हणाले,”जीव वाचविण्यास प्रथम प्राधान्य देत आहोत. त्यामुळे आणखी ६०० कुटुंबांना तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्याचा आदेश दिला आहे.”

मुख्यमंत्री धामी म्हणाले होते की, ''भाजपचे एक पथक जोशीमठ येथे पाठवण्यात आले असून मी  शनिवारी तेथे भेट देणार आहे.'' त्यामुळे ते आज, शनिवारी जोशीमठला भेट देऊन तेथील परिस्थितीची माहिती घेणार आहेत.


जोशीमठ येथे सुरू असलेल्या नॅशनल थर्मल पॉवर प्रकल्पामुळेच आणि प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे गावाला धोका निर्माण झाल्याचा आरोप करीत नागरिकांनी शुक्रवारी बंद पाळून प्रशासनाविरोधात असंतोष व्यक्त केला.

जोशीमठच्या सिंगधर भागात शुक्रवारी संध्याकाळी एक मंदिर कोसळले. त्यामुळे आधीच भीतीच्या छायेखाली असलेले रहिवासी चिंताग्रस्त झाले. मंदिर कोसळले तेव्हा मंदिरात कोणीही नव्हते. मंदिराला मोठय़ा भेगा पडल्यानंतर ते रिकामे करण्यात आले होते, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.


“जोशीमठ येथील ५६० घरांना तडे गेल्याने आणि अनेक ठिकाणची जमीन खचल्याने शुक्रवारी तेथील नागरिकांनी जोरदार निदर्शनेही केली. प्रशासनाविरोधात घोषणा देत लोक रस्त्यावर उतरले. दुकाने आणि आस्थापना बंद करण्यात आल्या. तसेच काही नागरिकांनी रस्ता अडवला,” असे जोशीमठ बचाव संघर्ष समितीचे निमंत्रक अतुल सती यांनी सांगितले.

“रहिवाशांचे त्वरित पुनर्वसन करावे, एनटीपीसी बोगद्याच्या बांधकामाबरोबरच बद्रिनाथकडे जाणारा हेलांग आणि मारवाडीदरम्यानच्या वळणरस्त्याचे बांधकामही थांबवण्यात यावे तसेच या संकटाची जबाबदारी एनटीपीसीच्या तपोवन-विष्णुगड जलविद्युत प्रकल्पावर निश्चित करण्यात यावी आदी मागण्या नागरिकांनी केल्या होत्या. त्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येईल,” असे सती यांनी सांगितले.

काँग्रेसनेही धामी सरकारने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. ''जोशीमठ येथे सातत्याने दरडी कोसळत आहेत. अनेक घरांना तडे गेल्यामुळे भयभीत नागरिकांना कडाक्याच्या थंडीत रस्त्यावरच रात्र काढावी लागत आहे. परंतु भाजपला फक्त सत्ता हवी आहे, नागरिकांच्या हिताची पर्वा न करता धामी सरकार सुखनिद्रेत आहे. जोशीमठला वाचवण्यासाठी तातडीने योग्य ती पावले उचलावीत,'' असे काँग्रेसने म्हटले आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com 

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.