पुणे, दि. 4 जानेवारी
2023 (चेकमेट टाईम्स): आबासाहेब गरवारे महाविद्यालय आणि विद्यार्थी विकास मंडळ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सावित्रीबाई
फुले अंतर महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे
कार्यवाह आणि प्रसिद्ध साहित्यिक, वक्ते वि.दा .पिंगळे
यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतीराव फुले यांच्यामुळे स्त्री शिक्षणाला
चालना मिळाली. स्त्रियांच्या आयुष्यातील अनेक वर्षांच्या पिळवणुकीचा, अज्ञानाचा आणि विषमतेचा अंधार दूर झाला. स्त्रियांच्या आयुष्याला आणि
भविष्याला दिशा मिळाली. शिक्षणाला जात धर्म नसतो, शिक्षणातूनच कार्यसिद्ध होते.
१९ व्या शतकात स्त्रियांचे असंख्य प्रश्न
होते बालविवाह, केशवपन, विधवा पुनर्वसन, शिक्षण घेण्यावर बंदी या सर्व
पुरुषप्रधान आणि सनातनी चक्रव्युहातून सुटण्याचे सामर्थ्य सावित्रीबाईंनी
शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रियांना दिले. समाजात समतेची परिवर्तनाची आणि ज्ञानाची
ज्योत लावण्यासाठी सावित्रीबाईंनी आपल्या पतींसोबत सर्व आयुष्य खर्च केले. शिक्षण
हे अलंकार म्हणून मिरवायची गोष्ट नाही तर स्त्रियांची आत्मसन्मानाची गोष्ट आहे. आज
स्त्रियांनी स्वतःच्या क्षमतेवर सर्व क्षेत्रात स्वतःला सिद्ध केले आहे. आज आम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला पण
तरीही स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार पूर्णता
थांबलेले नाहीत, याचेही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
वक्तृत्व ही कला अभ्यासातून चिंतनातून आणि
सूक्ष्म निरीक्षणातून समृद्ध होते. पाठांतर केलेली वाक्य हातवारे करून जोरात बोलणे म्हणजे वक्तृत्व नाही, तर वक्ता अभ्यासातून आणि वाचनातून घडत असतो. तुम्हाला चांगला वक्ता व्हायचं
असेल तर इतर वक्त्यांची भाषणे ऐका, चांगले वाचन करा
व समकालीन प्रश्न आत्मविश्वासाने मांडा तरच तुमचे वकृत्व श्रोत्यांच्या काळजावर
कायमचे कोरले जाईल असे वि.दा.पिंगळे यांनी आपल्या उदघाटनपर भाषणात विचार व्यक्त
केलेत.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.गौतमी पवार, कार्यक्रमाच्या संयोजक डॉ. वर्षा तोडमल, डॉ. अपर्णा आगाशे, तसेच समारोपाचा प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी विकास
मंडळाचे प्रमुख डॉ.संतोष परचुरे यांसोबत महाविद्यालयाचे अनेक प्राध्यापक उपस्थित
होते.
स्पर्धेचे हे 23 वे वर्षे होते .फर्ग्युसन
महाविद्यालयाची मुक्ता थोरात तिने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक सर
परशुरामभाऊ महाविद्यालयाचा आदित्य म्हस्के, तसेच तृतीय
क्रमांक विधी महाविद्यालयाचा प्रज्वल नलावडे याने पटकावला. नवलमल फिरोदिया विधी
महाविद्यालयाने हा करंडक पटकावला .या स्पर्धेत ज्ञानियांचे सुख, अष्टपैलू सावित्रीबाई फुले, आजच्या जगाची वाटचाल प्रगती की अधोगती ? जी.ए .एक चिंतन, इत्यादी विषयांवर विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण भाषणे
केली .स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रसिद्ध लेखक सुशील धसकटे व नेहा वैशपायन
यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पांडुरंग कंद यांनी केले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84