पुणे, दि. 14 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे
महापालिकेच्यावतीने गोवर आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विशेष लसीकरण मोहिमे अंतर्गत
लहान मुलांसाठी गोवर रुबेला लसीकरणाची दुसरी फेरी 16 ते 25 जानेवारी 2023 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या
सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण विभागात शुक्रवारी (दि. 13 जानेवारी 2023) झालेल्या बैठकीत गोवर प्रतिबंधक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत सावंत
यांनी गोवर रुबेला लस न घेतलेल्या जास्तीत जास्त बालकांचे लसीकरण करण्याच्या सूचना
दिल्या होत्या.
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुणे
महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात गोवर स्वेना आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना
करण्यात येत आहे. त्यानुसार 9 महिने
ते 5 वर्ष या वयोगटातील मुलांना लसीकरण करण्याचे आवाहन
महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
यापूर्वी बाह्य लसीकरण
सत्रांमध्ये 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2022 दरम्यान पहिली फेरी आयोजित करण्यात आली होती.
त्यामध्ये 9 महिने ते 5 वर्षे
वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यात आले होते. आता शहरातील 9
महिने ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना गोवर रुबेला लसीकरण
करण्यात येणार आहे. ही लसीकरण मोहीम महापालिका प्रशासनाच्या सर्व रुग्णालयात सुरू
करण्यात आली आहे.
महापालिकेच्या सर्व दवाखान्यात 16 ते 25
जानेवारी 2023 या कालावधीत
संपूर्ण शहरात लसीकरण मोहिमेची दुसरी फेरी होईल. त्यामध्ये 9 महिने ते 5
वर्षे वयोगटातील बालकांना गोवर रुबेला लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे.
तरी अद्याप ज्या बालकांनी या लसीचा डोस घेतला नाही, त्या
बालकांना पालकांनी नजीकच्या महानगरपालिक दवाखान्यात तसेच मनपा दवाखान्या अंतर्गत
घेण्यात येणाऱ्या बाह्य लसीकरण सत्रामध्ये जाऊन बालकांना गोवर रुबेला लसींचा डोस
त्वरित घ्यावा, असे आवाहन असे आवाहन महानगरपालिका आयुक्त
विक्रमकुमार यांनी केले आहे.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल
मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84