पुणे, दि. 11 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि मॉडेल उर्फी जावेद यांच्यातील वाद आता राज्यातील चर्चेचा विषय बनला आहे.
उर्फी जावेदच्या कपड्यांच्या स्टाईल विरोधात चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. उर्फीविरोधात तक्रार करुन तिने न्युडिटी पसरवल्याबद्दल चित्रा वाघ यांनी उर्फीच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर या दोघींचं ट्विटर वॉर चांगलंच रंगलं.
या वादात आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे. चित्रा वाघ यांना महिला आयोगाचे अध्यक्षपद हवंय म्हणून उर्फी जावेद हिच्या खांद्यावर त्यांनी बंदूक ठेवली, असा टोला सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांना लगावला आहे.
“सत्ताधारी पक्षाच्या महिलेकडे सर्वसाधारणपणे महिला आयोगाचं अध्यक्षपद जातं. त्यातही सत्तापक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षाचा त्या पदावर जास्त दावा असतो. आता जर भाजप सत्तेत आहे आणि भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आहेत. त्या न्यायाने कदाचित रूपाली चाकणकर यांना खाली खेचून चित्रा वाघ यांना महिला आयोगावर बसायचं असेल, त्यामुळे त्यांनी उर्फी प्रकरण काढलेलं असावं,” अशी शंका व्यक्त करत सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांना टोला लगावला.
“आता चित्रा वाघ यांची आमदारकीची सगळी शक्यता मावळली आहे. भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद हा नियम असल्याने त्यांना आता महिला प्रदेशाध्यक्ष पद मिळालं असल्याने त्यांची आमदारकी आणि मंत्रिपदाची सगळी शक्यता मावळली आहे. म्हणून चाकणकरांना खाली खेचून त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसायचं असेल. मात्र असं करताना त्यांना उर्फी जावेच्या खांद्यावर बंदूक ठेवायची असेल. ‘कही पे निगाहे कही पे निशाना’ अशा प्रकारे हा कार्यक्रम सुरू आहे,” अशी टोलेबाजीही सुषमा अंधारे यांनी केली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84