पुणे, दि. 6 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): संरक्षण विभागाने लष्करी अस्थापनांपासून ५० मीटर अंतरावर बांधकामांना बंदी घालण्याचा आदेश काढल्यानंतर महापालिकेने यासंदर्भात अभ्यास करून धोरणात्मक निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आहे.
संरक्षण विभागाने संपूर्ण देशासाठी एक नवी नियमावली तयार केली आहे. त्यामध्ये १८ मे २०११, १८ मार्च २०१५, १७ नोव्हेंबर २०१५, २१ नोव्हेंबर २०१६ या तारखेचे सर्व आदेश रद्द केले आहेत. त्याऐवजी आता २३ डिसेंबर २०२२ साठी रोजी काढलेले नवे आदेश लष्करी अस्थापनांच्या परिसरातील भागांसाठी लागू असणार आहेत.
त्यामध्ये संरक्षण विभागाच्या चीफ आर्मी स्टाफला हे आदेश दिले असून, ५० मीटर पर्यंत बांधकामास निर्बंध असतील. या अंतरात बांधकामे करू नये. ते धोकादायक असतील तर चीफ आर्मी स्टाफने त्वरित उच्चपदस्थांना त्याबाबत कळवावे. त्यानंतर उच्चपदस्थ अधिकारी त्याची तक्रार राज्य शासन व महापालिकेकडे करतील असे आदेश दिले आहेत.
त्यामुळे सध्या संरक्षण विभागाच्या आस्थापनांपासून ५० मीटरच्या आतील बांधकाम परवानगी देण्याबाबत संभ्रम आहे. तसेच ५० मीटर अंतरामध्ये चार मजल्यापेक्षा जास्त बांधकामावर बंधन येणार आहे, त्याचा फटका अनेक भागात बसणार आहे. त्यामुळे बांधकाम विभागाचे अधिकारी या नियमावलीचा अभ्यास करून धोरण तयार करणार आहेत. त्याचा आराखडा लवकरच जाहीर होईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान धोरणात्मक निर्णय जो पर्यंत होत नाही तो पर्यंत या भागातून नवीन प्रस्ताव दाखल झाल्यास त्यास तूर्त परवानगी देऊ नये. ते प्रस्ताव थांबवावे अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे लष्करी अस्थापानांपासून जवळ असलेल्या बांधकामांना फटका बसण्याची शक्यता आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला
वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली
हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर
चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84