पुणे, दि. 23 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): भांडणे
मिटविल्याच्या रागातून दोघांवर कोयत्याने वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न
केल्याच्या प्रकरणात पसार झालेल्या एका संशयित आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी
अटक केली. (Bharti University police arrested a suspect who stabbed two people who were trying to settle a fight.)
नाना दळवी, प्रेम शिंदे, आकाश काटकर अशी संशयित आरोपींची नावे आहेत. यातील प्रेम अंकुश शिंदे (रा.दत्तनगर, कात्रज, मुळ रा. खरीव पाबे, वेल्हा) याला अटक झाली आहे. जीवघेणा हल्ला करण्याची घटना नोव्हेंबर 2022 मध्ये आंबेगाव परिसरात घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पानशेत
येथे आंबेगाव येथील दोघांची भांडणे झाली होती. संबंधित भांडणे एका तरुणाने सोडविली
होती. त्याचा राग मनात धरून नाना दळवी, प्रेम शिंदे, आकाश
काटकर यांनी तरुणासह त्याच्या साथीदाराला 23 नोव्हेंबर 2022 रोजी आंबेगाव येथील गायमुख चौकात
मारहाण केली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील कोयत्याने तरुण व त्याच्या
साथीदारावर कोयत्याने वार केले होते. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले होते.
याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
सदरची कामगिरी परिमंडळ २ च्या पोलीस उप आयुक्त स्मार्तना पाटील, स्वारगेट विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, सचिन धामणे, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, शैलेश साठे, विश्वनाथ गोणे, अभिजीत जाधव, हर्षल शिंदे, मंगेश पवार, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, राहुल तांबे, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व
सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84