पुणे, दि. 11 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. या कंपनीच्या बेबी पावडरच्या विक्रीवरची बंदी उठवण्यात आली आहे.
न्यायमूर्ती गौतम पटेल आणि एसजी ढगे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. त्यामुळे आता या कंपनीला पावडरचं उत्पादन करता येणार असून विक्रीवरची बंदीही हटवण्यात आली आहे.
अन्न आणि औषध प्रशासन विनाकारण या प्रकरणात दिरंगाई करत आहे, अशी टिप्पणी कोर्टाने केली आहे. जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीचा बेबी पावडर बनवण्याचा परवाना रद्द करण्यासाठीची महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाची याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
याबाबत, मुंगी मारण्यासाठी आपण हातोडा वापरू शकत नाही, असं विधानही न्यायालयाने केलं आहे. तसंच एक सँपल स्टँडर्ड क्वालिटीचं नाही, म्हणून परवानाच रद्द करणं हे कठोर पाऊल असेल, असंही कोर्टाने नमूद केलं आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84