पुणे, दि.10 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): महापालिकेने कचऱ्यापासून गॅस निर्मिती, वीज निर्मिती, खत निर्मिती, बायोडिझेल निर्मिती केल्यानंतर आता रोज 350 टन कचऱ्याचा वापर करून हायड्रोजन निर्मितीच्या दृष्टीने पाऊल उचलले गेले आहे. यासाठी 'द ग्रीन बिलियन्स लिमिटेड' या कंपनीसोबत करार करण्यात आला आहे.
या प्रकल्पात कचऱ्यापासून हायड्रोजन तयार करण्यासाठी रिफ्यूज डेरिव्ह्ड फ्युएलच्या वापर केला जाईल. यासाठी ‘प्लाझ्मा गॅसिफिकेशन’ या तंत्रज्ञानाच्या वापर केला जाईल. हे तंत्रज्ञान भाभा अणू संशोधन केंद्रातील (बीएआरसी) व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरू यांच्या साह्याने विकसित केले गेले आहे.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी, महाप्रीतने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडसोबत भागीदारी करून पुण्यातील शहर गॅस वितरण साखळीमध्ये हायड्रोजन मिश्रणाचा प्रस्ताव ही दिला आहे. कचऱ्यापासूनच हायड्रोजन तयार होतो आणि हा शहराच्या गॅस वितरण नेटवर्कमध्ये येत असल्याने यातून आर्थिक फायदही होणार आहे. या प्रकल्पामुळे 2.5 दशलक्ष मेट्रिक टन समान कार्बन डायऑक्साईड कमी होऊ शकतो. त्याबरोबरच 3.8 दशलक्ष मेट्रिक टन पेक्षा जास्त कचरा डेपोमध्ये न जाता या प्रकल्पामध्ये घेतना जाईल.
या कचऱ्यामध्ये बायोडिग्रेडेबल, नॉन बायोडिग्रेडेबल आणि घरगुती कचऱ्याचा समावेश असणार असल्याने सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यातील द ग्रीन बिलियन्सच्या सुविधेमध्ये त्याचे विलगीकरण केले जाईल.
महात्मा फुले नविनीकरण ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रीत) या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाने या सुविधेतून निर्माण होणारा हायड्रोजन उचलण्याचा व हायड्रोजन वाहतुकीसाठी लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्याचा प्रस्तावही सादर केला गेला आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84