Type Here to Get Search Results !

पुणे महानगरपालिकेच्या “या रुग्णालयात” उभारण्यात आलेला ऑक्सिजन प्लांट हलवणार

 


पुणे, दि.10 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): कोरोनाबाधितांना ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज भासल्याने मार्च-एप्रिल 2021 मध्ये नायडू रुग्णालयात दोन ऑक्सिजन निर्मिती टँक, एक रिफिलिंग स्टेशन आणि एक लिक्वीड ऑक्सिजन टँक उभारण्यात आला. कोरोना महामारीच्या दोन्ही लाटांमध्ये रुग्णांवरील उपचारांमध्ये नायडू सांसर्गिक रुग्णालयाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.

महापालिकेच्या नायडू रुग्णालयाच्या परिसरात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येत असल्यामुळे नवीन इमारत आणि जुने वॉर्ड यांमधील जागेत असलेला ऑक्सिजन प्रकल्प हलवला जाणार आहे. याबाबत भवन रचना विभागाने आरोग्य विभागाला पत्र पाठवले आहे.

रुग्णालयाच्या परिसरातच प्रकल्प स्थलांतरित केला जाणार असून, गरज भासल्यास तातडीने पूर्ण क्षमतेने सुरू केला जाईल, असा दावा महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. नायडू रुग्णालयाच्या इमारतीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रयोगशाळा व इतर सुविधा उभारण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्ण इमारतीच्या मागच्या बाजूस असलेल्या दोन ब्रिटिशकालीन वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहेत. तिथे रुग्णांना सिलेंडरने ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे.

जगभरात कोरोनाचा कहर वाढत असताना ऑक्सिजन प्रकल्प इतरत्र हलवला जाणार असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुणे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे म्हणाले,”वैद्यकीय महाविद्यालयाचे काम सुरू होणार असल्याने ऑक्सिजन प्रकल्प हलविण्यात येणार आहे. मात्र, तो जवळपासच स्थलांतरित करण्यात येणार आहे.”

नायडू रुग्णालयातील दोन्ही टँकची क्षमता 2000 लिटर प्रतिमिनीट एवढी आहे. दोन्हीसाठी जवळपास 3.15 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. राज्य शासनानेही दुसर्‍या लाटेदरम्यान तेरा टन क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन टँक दिला. मात्र, गरज न भासल्याने तो अद्याप बसविण्यात आलेला नाही.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com 

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.