पुणे, दि. 6 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): कामावरून माघारी पाठवल्याच्या रागातून कामगाराने सुपरवायझरवर कोयत्याने वार केले. यामध्ये सुपरवायझर गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 3 जानेवारी 2023) सायंकाळी महाळुंगे येथील फ्लॅश कंपनीच्या आवारात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चव्हाण हे फ्लॅश कंपनीत सुपरवायझर म्हणून नोकरी करतात. तर, आरोपी त्यांच्या कंपनीत कामगार आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी 11:30 च्या सुमारास कामाच्या कारणावरून चव्हाण यांनी आरोपीला कामावरून घरी पाठवले. याचा राग मनात धरून मंगळवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास आरोपी त्यांना गेटवर दिसला.
‘तू इथे का थांबला’, असे चव्हाण यांनी विचारले असता आरोपीने त्याच्याजवळ असलेल्या पिशवीतून कोयता काढून त्याच्यावर वार केला. जखमी चव्हाण यांनी कंपनीच्या आत धाव घेतली असता आरोपीने त्यांचा पाठलाग करून त्यांच्या पाठीत कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले.
विकास आजाबराव चव्हाण (32, रा. महाळुंगे, ता. खेड, मूळ रा. वाशीम) असे जखमी सुपरवायझरचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सूरजकुमार रामदुलारे (रा. महाळुंगे, ता. खेड. मूळ रा. उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला
वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली
हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर
चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84