पुणे, दि. 2 जानेवारी 2023
(चेकमेट टाईम्स): माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आणि चिंचवड येथील प्रतिभा
ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक ज्येष्ठ व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. दीपक शहा यांना
यावर्षीचा ‘राष्ट्रीय बंधुता
पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
नवी पेठ येथील एस. एम. जोशी सभागृहात राष्ट्रीय बंधुता साहित्य
परिषद आणि औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय या
संस्थेतर्फे हे २४ वे राष्ट्रीय
बंधुता साहित्य संमेलन होईल.
येत्या १२ जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या २४ व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य
संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा
पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय बंधुता साहित्य
परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी दिली.
स्वागताध्यक्ष डॉ. विजय ताम्हाणे, प्रा. चंद्रकांत
वानखेडे, डॉ. अरुण आंधळे, ज्येष्ठ
गझलकार सिराज शिकलगार, मधुश्री ओव्हाळ, डॉ. अशोककुमार पगारिया, प्रकाश जवळकर यांचा संमेलनात
मुख्य सहभाग राहील. कोरोनासंबंधीचे सर्व
नियम पाळून हे संमेलन होईल, असे मुख्य संयोजक प्रा. डॉ.
प्रभंजन चव्हाण आणि प्रा. प्रशांत रोकडे यांनी सांगितले.
ज्येष्ठ साहित्यिक शंकर आथरे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी
१० वाजता प्रसिद्ध साहित्यिक सायमन मार्टिन यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन
होईल. दुपारच्या सत्रात महाराष्ट्रातील नामवंत कवी ‘काव्यपंढरी’ कविसंमेलनात
सहभागी होतील. यावेळी गुलाबराजा फुलमाळी (नेवासा) यांना लोककवी वामनदादा कर्डक,
किशोर बुजाडे (खामगाव) यांना लोकगायक प्रल्हाद शिंदे आणि अमोल
घाटविसावे (अहमदनगर) यांना पद्मश्री नामदेव ढसाळ काव्य पुरस्काराने सन्मानित
करण्यात येईल.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या
९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84