पुणे, दि. 3 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): येरवडा मध्यवर्ती
कारागृहातील तीन कैद्यांचा मृत्यू झाला आहे. तिन्ही कैद्यांचे मृत्यू हे
वेगवेगळ्या आजारपणातून झाल्याचे कारागृह प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. संदेश
अनिल गोंडेकर (वय २६, रा. डोणजे, हवेली),
शाहरूख बाबू शेख (वय २९, रा. कोंढवा), रंगनाथ चंद्रशेखर दाताळ (वय ३२, रा. मोरगाव, बारामती) असे मृत्यू झालेल्या कैद्यांची नावे आहेत.
याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात
अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, येरवडा कारागृहाच्या वतीने देण्यात येणाऱ्या आरोग्य
सुविधेबाबत सवाल उपस्थित केला जात आहे.
याबाबत येरवडा
पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम म्हणाले कि,”तिन्ही कैद्यांना
विविध प्रकारचे आजार होते, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय पथकाने
स्पष्ट केले आहे. एका कैद्याच्या कुटुंबीयांना त्याच्या मृत्यूबाबत शंका होती, त्याबाबत डॉक्टरांशी
त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांना मृत्यूचे कारण सांगण्यात आले आहे.”
गोंडेकर यास २०१८ मध्ये खुनाच्या
गुन्ह्यात अटक करण्यात आली होती, तेव्हापासून त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. त्याचे आई-वडील
त्याला भेटण्यासाठी नियमितपणे जात होते. ३१ डिसेंबरला त्याचे वडील त्यास
भेटण्यासाठी कारागृहात गेले होते. त्यावेळी त्यांना हवेली पोलीस ठाण्यामार्फत
त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचे कळाले. त्यानंतर त्यांनी मुलाच्या मृत्यूस
कारागृह प्रशासन जबाबदार असल्याचे सांगितले आणि आक्षेप नोंदविला. त्यानंतर येरवडा
कारागृहातील अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मृत्यू लिव्हर सोरायसिसमुळे
झाल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, शाहरूख शेख व रंगनाथ
दाताळ या दोन्ही कैद्यांनादेखील विविध प्रकारच्या आजारांनी ग्रासले होते. त्यातूनच
त्यांचा मृत्यू झाला. त्याबाबत येरवडा कारागृह प्रशासनाच्या वतीने संबंधितांच्या
कुटुंबीयांना पोलीस ठाण्यांमार्फत कळविले गेले आहे.
दरम्यान, याप्रकरणी येरवडा पोलीस
ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84