पुणे, दि.10 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): टिंगरेनगर येथील रोड नंबर 11, पंपिंग स्टेशनजवळ रहिवासी भागात गेल्या काही दिवसांपूर्वी लॉज सुरू झाला आहे. या सुरू झालेल्या लॉजमुळे स्थानिक नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे या लॉजचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी तक्रार राहिवाशांनी निवेदनाद्वारे विश्रांतवाडी पोलीस ठाणे व जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
टिंगरेनगर चार रहिवासी भागामध्ये या लॉजमध्ये येणार्या, जाणार्यांमुळे रहिवाशांना त्रास होत असल्याची तक्रार रहिवाशांनी स्थानिक आमदार सुनील टिंगरे, विश्रांतवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांच्यासह जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर म्हणाले,”या लॉजबाबत नागरिकांनी निवेदन दिले आहे. मात्र, हा लॉज परवानगी घेऊन सुरू करण्यात आला आहे. तरीदेखील नागरिकांना होणार्या त्रासाबद्दल आपण लॉजमालकाला सूचना दिल्या आहेत. लॉजचा परवाना रद्द करण्याबाबत नागरिकांनी जिल्हाधिकार्यांकडे पत्रव्यवहार करावा.”
आमदार सुनील टिंगरे म्हणाले की,“या लॉजमुळे होणार्या त्रासामुळे स्थानिक नागरिकांनी माझी भेट घेऊन माझ्याकडे तक्रारी केल्या आहेत. याबाबत मी नागरिकांना विश्रांतवाडी पोलीस ठाण्याकडे तक्रार करण्यास सांगितले आहे.”
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84