पुणे, दि. 12 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे सदर स्वच्छतागृह पूर्णत्वास गेले. महिला स्वच्छतागृहाचे लोकार्पण एसएनडीटीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. नलिनी पाटील यांच्या हस्ते तर पुरुषांच्या स्वच्छतागृहाचे लोकार्पण पुणे मेट्रोचे कार्य संचालक श्री. अतुल गाडगीळ यांच्या हस्ते झाले. यावेळी वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त श्री. राजेश गुर्रम उपस्थित होते.
नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी त्यांच्या विकासनिधीतून आपल्या पहिल्या टर्ममध्ये एसएनडीटी पादचारी पुलाखाली एक अत्याधुनिक पद्धतीचे, खास महिलांसाठी स्वच्छतागृह बांधले होते. ते पूर्ण क्षमतेने वापरले जात होते. मात्र मेट्रोचे स्टेशन येथे होणार असल्याने नाईलाजास्तव ते काढणे आवश्यक ठरले.
नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्ष असताना त्यांनी हे स्वच्छतागृह पाडण्यास मान्यता दिली. यावेळी त्याच्या बदल्यात महिला तसेच पुरूषांसाठी चांगले टॉयलेट बांधून देण्याची अट माधुरीताईंनी घातली होती.
त्यानुसार महामेट्रोने त्याची पूर्तता करून ते आरोग्य विभागाकडे हस्तांतरित केले. त्यांचे लोकार्पण आज करण्यात आले. त्यासाठी केअर टेकरची नियुक्तीही करण्यात आली आहे. हे नवेकोरे स्वच्छतागृह दत्तक घेण्यासाठी समाजातील धनिकांनी पुढे यावे, असे आवाहन यावेळी माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी केले.
एसएनडीटी महाविद्यालयातील एनएसएसच्या उत्साही विद्यार्थिनी व त्यांच्या शिक्षिका तसेच मनपाचे अधिकारी श्री. विश्राम देव व श्री. मेंढेकर तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी व स्वच्छ संस्थेचे सभासद व समन्वयक याप्रसंगी उपस्थित होते.
विभागीय आरोग्य निरीक्षक गणेश खिरीड यांनी सूत्रसंचालन केले तर क्षेत्रीय अधिकारी श्री. राजेश गुर्रम यांनी उपस्थितांचे आभार मानले. ह्या प्रोजेक्टसाठी मदत करणाऱ्या मेट्रो तसेच ड्रेनेज, पाणी पुरवठा, विद्युत व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल माधुरीताईंनी सर्वांचे आभार मानले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84