Type Here to Get Search Results !

सिंहगड घाटात पर्यटकांची रेनॉल्ट डस्टर पेटली; सुदैवाने जीवितहानी नाही

 

पुणे, दि. 9 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): सिंहगड घाटात रविवारी (दि. 8 जानेवारी 2023) संध्याकाळी 5:45 वाजण्याच्या सुमारास सिंहगडावर जाणार्‍या एका मोटारीला आग लागली होती. मोटार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. घाटातील शेवटच्या तीन किलोमीटरच्या टप्प्यात उंबरदांड परिसरात ही घटना घडली.

पर्यटक नाशिक वरून सिंहगडावर आले होते, अशी प्राथमिक माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. सिंहगडावर MH15 EB8659 ही गाडी जात होती. गाडीला अचानक आग लागली. गाडीमध्ये मध्ये चार पाच पर्यटक होते. ते गाडी थांबवून बाहेर पडले. त्यामुळे ते वाचले.

दरम्यान, वनविभागाचे संदिप कोळी, वनसंरक्षण समितीचे सुरक्षारक्षक तानाजी खाटपे, नितिन गोळे यांनी मोटारीला लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. घाटातील वाहतुक व्यवस्था देखील सुरळीत केली.

मोटारीला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलास कळविली. ‘पीएमआरडीए’चे नांदेड सिटी येथील अग्निशमन दल घटनास्थळी पोचले. त्यांनी आग पूर्णपणे विझवली. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com 

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.