Two Youths Unfortunately Die, One Injured in Warje Highway Accident; A case has been registered against two, one has been arrested
पुणे, दि.१३ जानेवारी २०२३ (चेकमेट टाईम्स): वारजे मधून गेलेल्या कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावर झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण जखमी झाला आहे. दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल एकाला अटक करण्यात आलेली आहे.
याबाबत वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरील घटना गुरुवार दि. १२
जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता वारजे मधून चांदणी चौकाच्या दिशेने जाणाऱ्या
मार्गिकेवर, डुक्कर खिंड भागातील वसुधा इताशा सोसायटी समोर घडली. यातील दुचाकी
चालक आणि सहप्रवासी असलेले तरुण बाळू लालू मेघावत (वय.१८ वर्ष) आणि सितीया शंकर
नैनावत (वय.२७ वर्ष, दोघेही रा. संजय गांधी वसाहत, लमाण तांडा, पाषाण, पुणे) यांचा
या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. तर टाटा एस छोटा हत्ती टेंपो क्र. एमएच १२
पीक्यू ८०२८ चा चालक ललितकुमार प्रकाशदास वैष्णव (वय.२४ वर्ष, रा. साई व्हेलॉसिटी,
मारी गोल्ड जवळ, बावधन, पुणे) हा जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
यामध्ये दुचाकीवरील बाळू मेघावत आणि सितीया नैनावत हे दोघेही त्यांच्या
ताब्यातील होंडा हॉर्नेट मोटारसायकल क्र. एमएच १२ एनएस ६९९३ वरून वारजे कडून
चांदणी चौकाच्या दिशेने जात असताना, वारजे मधील डुक्कर खिंड भागातील वसुधा इताशा
सोसायटी समोर जाम झालेला छोटा हत्ती टेंपोचा टायर दुरुस्त करत असलेल्या टेंपो आणि चालक
ललितकुमार वैष्णव यांना धडक मारून दोघेही रस्त्यावर पडले.
यावेळी त्याच क्षणाला मागून भरधाव वेगात आलेल्या आयशर टेंपो क्र. एमएच 04
सीयू ८७०८ वरील चालक संतोष शंकर भोसले (वय.४३ वर्ष, रा. मु. पो. उगलेवाडी,
सह्याद्री हॉटेलच्या मागे, ता. कराड, जि. सातारा) याला टेंपोवर नियंत्रण मिळवण्यात
अपयश येऊन, त्याने दोघांनाही धडक दिली. यामध्ये बाबू मेघावत आणि सितीया नैनावत
दोघेही गंभीर जखमी होऊन, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर या दोघांनी धडक
दिलेला छोटा हत्ती टेंपो चालक ललितकुमार वैष्णव याच्यावर उपचार सुरु आहेत.
सदरील घटनेत दोन्ही टेंपो चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, संतोष
शंकर भोसले याला अटक करण्यात आली आहे. तर सध्या उपचार सुरु असलेला टेंपो चालक
ललितकुमार वैष्णव याच्यावरील उपचार झाल्यानंतर त्याला अटक करण्यात येणार असल्याचे
वारजे पोलिसांनी सांगितले. दरम्यान सायंकाळच्या वेळी झालेल्या अपघातामुळे
वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. यावेळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी वारजे वाहतूक
विभागाचे पोलीस हवालदार राकेश कांबळे, विशाल भिलारे, पोलीस नाईक मुकुंद पवार, पोलीस शिपाई लहू लोंढे यांनी प्रयत्न केले.
सदरील अपघातामध्ये अपघातग्रस्त मोटारसायकलला मागच्या बाजूने कोणीतरी धडक
दिली असल्यानेच हा अपघात झाला असल्याबाबतचा संशय मयत तरुणांच्या नातेवाईक
मित्रमंडळीनी उपस्थित केला आहे. तर जर दुचाकीवरील तरुणांनी उभ्या टेंपोला धडक दिली
असती, तर दुचाकीचे पुढून देखील नुकसान झाले असते, मात्र ते झालेले दिसत नसल्याचे
सांगत, अपघाताबाबत शंका उपस्थित केली आहे. याबाबत वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ
पोलीस निरीक्षक दगडू हाके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ता बागवे यांच्या
मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्रिती पाटील पुढील तपास करत आहेत.
वरील वृत्त खाली
लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला
ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली
हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर
चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes