पुणे, दि. 6 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): वेल्हे तालुक्यातील करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने एका हाँटेल कामगाराचा उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा प्रकार मंगळवारी (ता. 3 जानेवारी 2023) रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
गणेश महादेव सावंत (वय 45, मुळ राहणार कापडे बुद्रुक, ता. पोलादपुर, जि. रायगड, सध्या रा. आस्कवडी, ता. वेल्हे) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात अकस्मित मयताची नोंद करण्यात आली आहे.
आस्कवडीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब दसवडकर यांच्या हाँटेलमध्ये सफाई कामासाठी मयत गणेश सावंत व त्यांची पत्नी असे दोघे जण दोन दिवसांपूर्वी आले होते. मंगळवारी रात्री गणेश याला दम्याचा त्रास होऊ लागल्याने तो पत्नीसह करंजावणे येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी आला. मात्र तेथे डॉक्टर नसल्याने त्याला आवश्यक ते उपचार मिळाले नाहीत. एक पारिचरीका व एक शिपाई असे दोन कर्मचारी यावेळेस केन्द्रात होते.
गणेश याला पुन्हा त्रास होऊन त्याची प्रकृती गंभीर बनली. मात्र रुग्णवाहिकाही नसल्याने त्याला तेथुन दुसऱ्या दवाखान्यात जाता आले नाही. थोड्या वेळाने गणेश याचा आरोग्य केंद्रातच तडफडून मृत्यू झाला.
या बाबत वेल्हे तालुक्याचे प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुर्यकांत कारळे म्हणाले की, मयत गणेश सावंत आरोग्य केंद्रात आले त्यावेळी तेथे डॉक्टर नव्हते. कंरजावणे केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दोन्ही जागा रिक्त आहेत. त्यामुळे शेजारील आंबवणे उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे तात्पुरता प्रभारी जबाबदारी दिली आहे. ते 4:30 वाजता आंबवणे येथे निघून गेले होते.
डॉक्टर अभावी रुग्णांना उपचार मिळत नाही. अशी वेळ परत येऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. करंजावणे केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे दिला आहे.
वेल्हे पोलीस ठाण्याचे अंमलदार योगेश जाधव म्हणाले,”गणेश सावंत हे डॉक्टर तपासणी पुर्वी मयत झाल्याचे पत्र कंरजावणे केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने दिले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गणेश सावंत याचा मुत्यू झाला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मयताचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात कोणीही तक्रार दाखल केली नाही.”
शिवसेनेचे वेल्हे तालुका प्रमुख दिपक दामगुडे म्हणाले,”अनेक महिन्यांपासून तालुक्यातील आरोग्य केंद्रात पुरेसे डॉक्टर कर्मचारी नाहीत त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. जिल्हा परिषदेने आवश्यक कर्मचारी डॉक्टर नियुक्त करावे.”
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला
वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली
हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर
चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84