पुणे, दि.10 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): सतत होणाऱ्या घरफोड्यांनी पुणेकर हैराण आहेत. पण, काही केल्या पोलिसांना या घटना रोखता येत नसल्याचे वास्तव आहे. शहरात घरफोड्या करणाऱ्या टोळ्यांनी चांगलाच उच्छाद घातला आहे.
अशीच एक घटना वारजेत घडली आहे. बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी 68 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी अभय आंभोरकर (वय 49) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 3 ते 8 जानेवारी या कालावधीत हा प्रकार घडला आहे. तक्रारदार यांचे वडिल रोजरी स्कुल शेजारील इमारतीत राहण्यास आहेत. त्यांचा फ्लॅट बंद असताना चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला व घरातील 68 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.
तर, दुसरी घटना कोंढव्यात घडली असून तेथे बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी तब्बल सव्वा पाच लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात आराफत खान (वय 32) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार खान हे कोंढवा बुद्रुक परिसरात राहतात. ते नव्या वर्षात कुटूंबासह (1 ते 7 जानेवारी 2023) फिरण्यासाठी बंगलुरू येथे गेले होते. या दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून 4 लाख 46 हजारांचे दागिने चोरून नेले. खान कुटूंबासह परत आल्यानंतर चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84