पुणे, दि. 5 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरंध (वरंधा) घाटात सेल्फी घेणे एका शिक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. सेल्फी काढताना शिक्षक थेट 600 फूट खोल दरीत पडला.
घाटात वाघजाई मंदिर परिसरात गाडी रस्त्याच्या कडेला लावून माकडांना खायला देत सेल्फी घेत असताना संध्याकाळी सुमारे 5 वाजता ही घटना घडली होती. नऊ तासांच्या अथक प्रयत्नानंतर स्थानिक रेस्क्यू टीमला मध्यरात्री 3 वाजता शिक्षकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे.
अब्दुल शेख असं या शिक्षकाचं नाव आहे. अब्दुल कुदबुद्दीन शेख हे (रा. एरंडी कोरंगळा, जि. लातूर) येथील रहिवाशी असून ते सध्या त्यांच्या कुटुंबासह भोर तालुक्यातील नसरापूर येथे राहत होते. तसेच ते (मंडणगड जि. रत्नागिरी) येथे प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीला होते. तर त्यांची पत्नी (करंजावणे ता. वेल्हा) येथे प्राथमिक शिक्षिका आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरंध घाट परिसरातील वाघजाई मंदिर परिसरात, गाडी रस्त्याच्या कडेला लावून एक शिक्षक माकडांना खायला घालताना सेल्फी घेत असताना तोल जाऊन खोल दरीत पडला. मंगळवारी 3 जानेवारीला संध्याकाळी सुमारे 5 वाजता ही घटना घडली होती. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनी घटनेची दखल घेत रेस्क्यू टीमच्या मदतीने घटनास्थळी दाखल होत 9 तासांच्या अथक प्रयत्नानंतर खोल दरीत पडलेल्या शिक्षकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.
दरम्यान, घटनास्थळी संबंधित व्यक्तीची MH 03 BE 7415 क्रमाकांची लाल रंगाची कार आढळली आहे. त्यावरून पुढील तपास करत पोलिसांनी त्यांच्या घरच्यांचा शोध घेतला आहे. महाडची साळुंखे रेस्क्यू टीम आणि भोरच्या सह्याद्री सर्च रेस्क्यू टीमकडून हे शोधकार्य करण्यात आले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84