Type Here to Get Search Results !

प्रशासक राज मुळे नदीपात्र रस्त्यातील अडथळा दूर करत, रस्ता झाला खुला

 

पुणे, दि. 12 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पेठा, शिवाजीनगर हा भाग कोथरूड, सिंहगड रस्ता, वारजे परिसराला जोडणारा आणि या भागातील लाखो नागरिकांसाठी सोईचा असणारा बाबा भिडे पूल ते रजपूत वस्ती हा नदी काठचा रस्ता अखेर चार महिन्यानंतर सुरू होत आहे.

कर्वे रस्ता किंवा सिंहगड रस्त्यावरून मोठा वळसा घालून वाहतूक कोंडींतून जावे लागत असल्याने नागरिकांची होणारी गैरसोय पाहून प्रशासनाने चार दिवसात रस्ता खुला करू असे आश्‍वासन दिले होते. ती मुदत उलटून गेली तरीही काम सुरू होतेच.

रजपूत वस्ती येथील रस्ता चार महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे सिंहगड रस्ता, कोथरूड, वारजे, धायरी, कर्वेनगर यासह इतर भागातील नागरिकांना नदी काठच्या रस्त्याचा वापर करता येत नाही.

रजपूत वस्तीमध्ये पथ विभागाशिवाय मलःनिसारण आणि पाणी पुरवठा विभागाच्या कामांना जास्त वेळ लागला, त्यामुळे पथ विभागाला रस्त्याचे डांबरीकरण करता येत नव्हते. हे काम संपल्याने अखेर बुधवारी (दि. ११ जानेवारी 2023) दुपारी रजपूत वस्तीत खोदलेला रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले आहे.

महापालिकेने येथील आवश्‍यक काम पूर्ण केले असून, आज पासून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. हा रस्ता गुरूवार सकाळ पासून सुरू होणार आहे. पथ विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजीत डोंबे यांनी यासह दुजोरा दिला.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com   

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.