Type Here to Get Search Results !

पार्टीतली मस्ती बेतली जीवावर, स्विमिंगपूल मध्ये बुडून तरुणाचा मृत्यू



पुणे, दि. 5 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या तरुणाचा स्वमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. निखिल निकम असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

जुना खंडाळा घाटात असलेल्या एका सोसायटीच्या बंगल्यात हा प्रकार घडला आहे. लोणावळा पोलीस ठाण्यात या प्रकरणी घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लोणावळा परिसरात अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाढदिवस साजरा करण्यासाठी जुना खंडाळा घाटातील एका बंगल्यात निखिल हा त्याच्या मित्रांसोबत आला होता. वाढदिवस साजरा करताना तो मित्रांसोबत दारू प्यायला होता. दारुच्या नशेत तो स्विमिंग पूल शेजारी गेला आणि तोल जाऊन तो स्विमिंग पुलमध्ये पडला. त्याला पोहता येत नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळेच स्विमिंग पूलमध्ये बुडाला. मित्रांनी त्याला रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

याप्रकरणी विशाल नानासाहेब निकम (वय-३२, शिवराम हाईट, विष्णुदेव नगर, पुनावळे) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेले सर्व मित्र पिंपरी-चिंचवड परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. दारू पिऊन कुणीही पाण्याच्या आसपास जाऊ नये स्विमिंग पुलाजवळ जाऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

लोणावळ्यातील बंगल्यांच्या स्विमिंग पुलाच्या पाण्यात बुडून सात महिन्यांत चौघांचा मृत्यू झाला आहे. १३ जुलैला एका दोन वर्षाच्या बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर २९ जुलैला १३ वर्षांच्या मुलाचा तर रविवारी २७ नोव्हेंबरला पुन्हा एकदा दोन वर्षाच्या बालिकेचा स्विमिंग पुलाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आता ४ जानेवारीला म्हणजे आज पहाटे साडेतीनला २२ वर्षीय निखिलचा मृत्यू झाला आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84     


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.