Type Here to Get Search Results !

व्यसनमुक्त भारतासाठी युवा वंदन बाईक रॅली

 

पुणे, दि. 12 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): राजमाता जिजाऊ साहेब आणि भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त व्यसनमुक्त व सशक्त भारतासाठी पुण्यात युवा वंदन बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांच्या पुढाकारातून ही रॅली निघाली. भारत माता की जय, वंदे मातरम, व्यसनमुक्त भारत-सशक्त भारत, जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला.

सातारा रस्त्यावरील स्वामी विवेकानंद पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात झाली. देशभर स्वच्छता जनजागृती करणारे विक्रांत सिंग यांनी स्वच्छतेचे व व्यसनमुक्तीचे महत्व सांगितले. सातारा रस्त्याने स्वारगेट-टिळक रोड-अप्पा बळवंत चौक-शनिवारवाडा मार्गे लाल महालापर्यंत ही रॅली निघाली. लाल महाल येथे राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून रॅलीची सांगता झाली.

लाल महाल येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर कमलताई व्यवहारे, माजी नगरसेवक रविंद्र धंगेकर, बाळासाहेब आमराळे, युवानेते पुष्कर आबनावे, कुणाल माने, इरफान शेख, शिक्षक धोंडीबा तरटे, मंगला धुमाळ, अजित जाधव, ओंकार साबळे, प्रथमेश दिवेकर, पूर्व खानविलकर, प्राजक्ता ठकार यांच्यासह युवक काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी व्यसनमुक्त भारताचा संकल्प करत विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांनी केलेले कार्य, तसेच व्यसनमुक्त भारताचे महत्त्व प्रथमेश आबनावे यांनी विशद केले.

याबाबत युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे म्हणाले,”राष्ट्रीय युवा दिनानिमित्त व्यसनमुक्त भारत, युवाशक्तीला समता, बंधुता याचे महत्व पटवून देण्यासाठी ही रॅली आहे. युवकांना अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढून चांगल्या मार्गावर घेऊन जाण्याचा संदेश दिला गेला. युवकांना रोजगार, चांगले शिक्षण देणारे उपक्रम राबवायला हवेत.”

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com   

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.