याबाबत
मयताचे मित्र सचिन भिमाजी जाधव (Sachin bhimaji
jadhav) यांनी फिर्याद (complaint) दिली. ही
घटना पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटा (nashik highway- aalephata) येथे घडली. मयुर अशोक सोमवंशी (mayur ashok somvanshi) (रा. राजुरी) असे खुन केलेल्या गॅरेज कामगार (garage worker) आरोपीचे नाव आहे.
ही घटना मंगळवारी (दि. 24 जानेवारी 2023) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला.
मिळालेल्या
माहितीनुसार, विनायक उर्फ संतोष
बबन गोडसे याची क्रुझर गाडी (एमएच 14 डीटी 5308) एक महिन्यापूर्वी दुरुस्तीसाठी पुणे-नाशिक महामार्गावरील हैदरभाई
यांच्या गॅरेजवर लावली होती. गाडी दुरस्ती बिलाच्या 7 हजार 600 पैकी 7 हजार 100 रुपये रोख
दिले होते. गॅरेज कामगार मयुर सोमवंशी याला 500 रुपये देणे
बाकी होते. उर्वरित 500 रुपयासाठी मयुरने गोडसेकडे फोनवर
सारखा तगादा लावला होता.
मंगळवार
सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास
आरोपी मयुर सोमवंशी याने संतोष गोडसे यांना फोनवरून शिवीगाळ करत ‘गॅरेजवर ये तुला
बघून घेतो’ अशी धमकी (threatened) दिली. संतोष आळेफाटा
चौकातून लगेच गॅरेजकडे गेला. यावेळी दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला. यातून
आरोपी मयुर सोमवंशी याने संतोष गोडसे यांच्या छातीवर हातातील चाकूने
(knife) वार केले आणि नंतर स्वतःवरही वार करुन घेतले.
त्यानंतर जखमी संतोष गोडसे यांना आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. नंतर त्याला पुढील उपचारासाठी पुण्यात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. टुरिस्ट व्यावसायिक विनायक उर्फ संतोष बबन गोडसे याचा खून केल्यानंतर आरोपी गॅरेज कामगार मयूर सोमवंशी याने स्वतःवरही वार करुन घेतले. पोलिसांनी त्याला तात्काळ उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये रात्री दाखल केले. त्यावर पोलीस बंदोबस्तात उपचार सुरु आहे.
सचिन
जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी मयुर सोमवंशी याच्या विरोधात भादवि कलम 302, 504, 506, 507 प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला
आहे. पुढील पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे करत आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व
सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84