पुणे, दि. 18 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): शिक्षण
विभागातील वरिष्ठ अधिकारी अनेकवेळा रजेवर जातात. त्यामुळे शिक्षण विभागाच्या विविध
कार्यालयांत कामानिमित्त आलेल्या लोकांना आर्थिक आणि मानसिक फटका बसतो. महाराष्ट्र
शिक्षण सेवा (प्रशासन शाखा/शिक्षण सक्षमीकरण शाखा) मधील गट ’अ’ व गट ’ब’ मधील अधिकारी हे वेगवेगळ्या कारणास्तव अर्जित,
परिवर्तित, किरकोळ रजेवर असतात. (Education Commissioner Suraj Mandhare told that If senior officers of education department want leave, they need to handing over charge to another officer for that period.)
अशा दांडीबहाद्दर अधिकार्यांना आता शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी
चाप लावला आहे. यापुढे त्यांना रजा हवी असल्यास पदभार दुसर्या अधिकार्याकडे
सोपवूनच रजा घेता येणार असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.
रजेच्या काळात कार्यालयीन कामकाजावर परिणाम होतो. त्यामुळे पुढील
गोष्टी करणे अनिवार्य असेल-
· रजा
कालावधीत कार्यालयप्रमुखाचा प्रभार अन्य समकक्ष किंवा त्यापेक्षा एकस्तर कनिष्ठ अधिकार्यांकडे
विनाविलंब सोपविणे.
· अधिकार्यांनी
रजेवर जाण्यापूर्वी कार्यालयप्रमुखास किती दिवस रजा घेणार आहे, याबाबतची लेखी पूर्वकल्पना देणे.
· संबंधित
अधिकारी अर्जित रजेवर जात असल्यास किंवा तीन दिवसांपेक्षा अधिक किरकोळ रजेवर जात
असल्यास संबंधित पदाचा पदभार अन्य अधिकार्याकडे देणे
· विभागस्तर उपसंचालक राज्यस्तरावर संबंधित संचालक व आयुक्त शिक्षण कार्यालयास तसे कळविणे.
याबाबत शिक्षण आयुक्त म्हणाले कि,“अतिरिक्त कार्यभार संबंधित
कार्यालयप्रमुख नियंत्रण अधिकारी यांनी तत्काळ सुपूर्त करण्याबाबत शिक्षण आयुक्त
कार्यालयाने क्षेत्रीय अधिकार्यांना सूचना दिलेल्या आहेत. शिक्षण आयुक्तांच्या
स्तरावर बैठका किंवा दौर्याचे आयोजन केले असल्यास कोणासही रजा मंजूर करण्यापूर्वी
आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. संबंधित सूचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधित
रजेचा कालावधी अनधिकृत अनुपस्थिती म्हणून गृहीत धरला जाईल.”
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल
मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84