Type Here to Get Search Results !

बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी होऊन गळ्याला 10 टाके

 

पुणे, दि. 18 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याचा नायलॉनच्या मांजाने गळा कापल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने ते बचावले असून त्यांच्या गळ्याला दहा टाके घालण्यात आले आहेत. नवनाथ मांढरे असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. (An incident has come to light where fireman's throat was cut with nylon rope. Fortunately, he survived and received ten stitches on his neck.)

 

मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाचे कर्मचारी नवनाथ मांढरे हे मंगळवारी (दि. 17 जानेवारी 2023) दुपारी 2 वाजता भवानी पेठेतील अग्निशमन दलाच्या केंद्रात आले होते. त्यानंतर त्यांना ड्युटीसाठी कोंढवा येथे पाठवण्यात आले. ते कोंढवा येथे जात असताना डायस प्लॉट येथील नवीन उड्डाणपुलावर त्यांची दुचाकी आली असता त्यांच्या गळ्यात मांजा अडकला. गाडी थांबवेपर्यंत त्यांचा गळा कापला. त्यांच्या गाडीचा वेग कमी असल्याने ते थोडक्यात बचावले.

 

यानंतर त्यांनी याबाबत अग्निशमन कर्मचारी गणेश ससाणे यांना फोन करुन सांगितले. त्यांनी लगेच ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे धाव घेतली. त्यांनी मांढरे यांना तातडीने बिबवेवाडी येथील रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांच्या गळ्यावर दहा टाके घालण्यात आले आहेत.

 

मकरसंक्रांतीला नायलॉन मांजासाठी बंदी असतानाही तो वापरला जातो. त्यामुळे पक्षी आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. अनेक विक्रेते मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाची विक्री करत असतात. पतंग दूरपर्यंत उडतो अशी अनेकांची समजूत आहे. त्यामुळे अनेक हौशी नायलॉन मांजाचा वापर करतात. मात्र या मांज्यामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.