पुणे, दि. 23 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पत्नीच्या अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून एकाने आपल्या राहत्याघरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना इंदापूर तालुक्यातील बावडा येथे घडली. यासंदर्भात मयताचा मोठा भाऊ मुस्तफा जिलानी मुलाणी (रा. बावडा, ता. इंदापूर) याने फिर्याद दिली होती. (Husband committed suicide in bavda (indapur) by hanging himself due to wife's extra marrital affair.)
मयताचे नाव जावेद जिलानी मुलाणी
(वय 32 वर्षे, रा.
बावडा, ता. इंदापूर) असे आहे. याप्रकरणी प्रवीण ऊर्फ बाबा
तानाजी सावंत (रा. बावडा, ता. इंदापूर) व काजल मुलाणी
यांच्या विरुद्ध इंदापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत
जावेद आणि आरोपी सावंत हे शाळकरी मित्र होते. 2017 मध्ये
जावेदचे काजलशी लग्न झाले होते. मित्र असल्याबरोबरच पैशांच्या व्यवहारामुळे प्रवीणचे
जावेदच्या घरी नेहमी येणे जाणे होते. त्यातूनच प्रवीण आणि काजल यांचे प्रेमसंबंध
जुळले. परिणामी पत्नीशी भांडण आणि तणावामुळे जावेद व्यसनाच्या आहारी गेला.
त्यातच प्रेमसंबंधाच्या आड
येणाऱ्या जावेदला दोघा आरोपींकडून सतत मारहाण होत होती. तसेच शनिवारी (ता. 21 जानेवारी
2023) सकाळी घरी येत
आरोपीने मारहाणीची पुनरावृत्ती केली. परिणामी तणावात असलेल्या जावेदने आपल्या
राहत्या घरातील पत्र्याच्या लोखंडी चॅनलला गळफास घेऊन आत्महत्या केली.
प्रवीण आणि काजल यांच्यावर जावेदला
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व
सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84