Type Here to Get Search Results !

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी भारत फ्लॅग फाऊंडेशनची मोहीम

 

पुणे, दि. 25 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स):  प्रजासत्ताक दिनानिमित्त (republic day) घरीदारी, वाहनांसाठी घेतले जाणारे राष्ट्रध्वज (indian flags) नंतर इतस्ततः पडून त्याचा अवमान ((flag desecration) होऊ नये म्हणून भारत फ्लॅग फाऊंडेशनने (bharat flag foundation) पुढाकार घेतला आहे. नागरिक आणि संस्थांनी इतस्ततः पडलेले ध्वज आढळल्यास ते भारत फ्लॅग फाऊंडेशन, मुरुडकर झेंडेवाले, पासोडया मारूती मंदिरासमोर, बुधवार पेठ (murudkar zendewale, pasodya maruti budhwar peth) येथे जमा करावेत, असे आवाहन फाऊंडेशनचे संस्थापक गिरिश मुरुडकर ((girish murudkar), कार्यकारी अध्यक्ष राहुल भालेराव (rahul bhalerao) यांनी केले आहे.

मुरुडकर म्हणाले,”15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी अनेकजण राष्ट्रध्वज विकत घेऊन मोठ्या अभिमानाने मिरवतात; मात्र हेच कागदी आणि प्लास्टिकचे छोटे-छोटे राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, कचऱ्यात किंवा गटारात पडलेले आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लवकर नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजाची विटंबना पहावी लागते, तसेच प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे, हे कायदाबाह्य ठरते.”

 

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची अशा प्रकारे होणारी विटंबना रोखण्यासाठी भारत फ्लॅग फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाचे हे २२ वे वर्ष आहे. जमा साहित्याची शास्त्रशुद्ध, सन्मानपूर्वक पद्धतीने विल्हेवाट (disposal) लावली जाते. या मोहिमेत सामिल होण्यासाठी  महितीपत्रक (Prospectus) व बॉक्सेस (boxes) हे फाउंडेशन तर्फे विनामूल्य (free of cost) पुरवले जातील.

 

गिरीश मुरूडकर 9822013292, राहुल भालेराव 9822596011 यांच्याशी  संपर्क साधता येईल.ज्या तिरंग्यासाठी हजारोनी बलिदान केले, तो तिरंगा पायदळी जाऊ नये, याची काळजी घ्यावी, ध्वजविषयक आदर्श संहितेचे पालन करावे, असे आवाहनही फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे . 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.