पुणे, दि. 16 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): शहरात मोठ्या प्रमाणात
व्यावसायिक अस्थापना आहेत. त्यांची जाहिरात (advertisement) करण्यासाठी अनेक व्यावसायिक
भित्तीपत्रकाचा वापर करतात. ही भित्तीपत्रके सार्वजनिक ठिकाणी (public places) महापालिकेने
केलेल्या रंगरंगोटीवर अथवा नागरिकांसाठी असलेल्या सूचना फलकांवर लावली जातात, त्यात, प्रामुख्याने
बस थांबे, पथदिवे, स्वच्छतागृहे,
सार्वजनिक भिंती, महापालिकेच्या मिळकती,
तर शहरातील ऐतिहासिक वास्तूंवरही (historical places) ही पत्रके राजरोसपणे चिटकविली
जातात.
आतापर्यंत महापालिका केवळ अनधिकृत होर्डिंग आणि फ्लेक्स
लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात होती. तर क्वचितच एका राजकीय नेत्यावर शहर
विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल करण्यात येत होता. मात्र, आता ‘जी-20’ परिषदेच्या (G-20 Summit) निमित्ताने आयुक्तांनी शहर स्वच्छ ठेवण्यासह अशा प्रकारे शहर विद्रुप करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले असून, त्याची
सुरुवात कसबा विश्रामबागवाडा (Vishrambagwada) क्षेत्रीय कार्यालयाने सुरू केली आहे.
याप्रकरणी जागा मिळेल तिथे भित्तीपत्रके चिटकवून शहर विद्रुप
करणाऱ्यांवर आता महापालिकेकडून गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महापालिकेच्या
कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाकडून अशी भित्तीपत्रके लावणाऱ्या 10 व्यावसायिकांवर फौजदारी
गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आणखी 9 जणांविरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी कारवाई सुरू केली आहे. या
भित्तीपत्रकांवरील कंपनीचे नाव आणि मोबाइल क्रमांकाच्या आधारे गुन्हे दाखल करण्यात
आले आहेत.
खासगी क्लासेस, स्पर्धा परीक्षा क्लासेस, डबेवाले,
सोने तारण, घरगुती व्यावसायिक, वैद्यकीय उपचार, कर्ज मिळवून देणे, घरबसल्या नोकरी, दुर्धर आजारावरील उपचार, सलून, ब्यूटी पार्लर, भविष्यवाले,
मालमत्ता खरेदी-विक्री, वाहन दुरुस्ती,
भंगारवाले, नोकरीविषयक अशा भित्तीपत्रकांची
शहरात भरमार आहे.
“महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार, शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांवर थेट
फौजदारी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे, आतापर्यंत
कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाकडून 9 जणांविरोधात तक्रारी देण्यात आल्या
आहेत. तसेच क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात व्यावसायिक अस्थापना
असल्याने त्यांनाही नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत.” असे महापालिकेचे सहाय्यक
आयुक्त आशिष महाडदळकर म्हणाले.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल
मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84