पुणे, दि. 5 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): थोर साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाचे काम एका वर्षात पूर्ण करावे, त्यासाठी येत्या आठवड्यात निविदा प्रकिया सुरू करावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
कोथरूडमध्ये हे तीन मजली भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. पहिल्या आणि तिसऱ्या मजल्यावर पाच विविध दालने आणि दुसऱ्या मजल्यावर प्रयोजित रंगभूमीसाठी नाट्यगृह नियोजित आहे. २०१८ मध्ये स्मारकाची जागा निश्चित झाली होती. या बांधकामाचे क्षेत्रफळ तीन हजार २३०.७८ चौरस मीटरएवढे असणार आहे. प्रदर्शन केंद्राच्या स्वतंत्र इमारतीचे क्षेत्रफळ आठ हजार ५८०.३२ चौरस मीटर असून, त्याचे काम अद्यापही गती घेऊ शकलेले नाही.
पालकमंत्री पाटील यांनी गदिमांच्या नियोजित स्मारकाला भेट देत अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली. या वेळी पुणे महापालिकेचे अतिरिक्त (विशेष) आयुक्त विकास ढाकणे, अधीक्षक अभियंता हर्षदा शिंदे उपस्थित होत्या.
पाटील म्हणाले, ‘‘गदिमांच्या स्मारकाच्या मूळ इमारतीचे काम आधी पूर्ण करणे आवश्यक आहे. सुरू असलेल्या प्रदर्शन केंद्राच्या कामासोबत स्मारकाचे कामही सुरू करावे आणि पुढील वर्षी गुढीपाडव्यापर्यंत ते पूर्ण करावे. स्मारकाच्या आतील सजावटीचा आराखडा तयार करताना गदिमांच्या कुटुंबीयांशी चर्चा करावी व पुढील आठवड्यात त्याचे सादरीकरण करावे. गदिमांच्या कार्याला साजेसे, असे स्मारक उभे राहील, याकडे विशेष लक्ष द्यावे.’’
“गदिमाप्रेमी व आम्ही माडगूळकर कुटुंबीय गेली ४५ वर्षे स्मारकासाठी प्रयत्नशील आहोत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्मारकाच्या जागेला आपणहून भेट दिली व पुढील निर्देश दिले, याचे स्वागत आहे. मात्र स्मारकाची लवकरात लवकर निविदा काढा, हे त्यांचे विधान गोंधळात टाकणारे आहे. याचा अर्थ भूमिपूजनानंतर पुढील दीड वर्ष काहीच काम झाले नाही का? प्रशासनाने तर काम वेगाने सुरू आहे, असे सांगितले होते. हा गोंधळ दूर होणे आवश्यक आहे. चंद्रकांत पाटील यांनी यात सलग लक्ष घालून स्मारक पूर्णत्वास न्यावे, ही विनंती आहे.” असे ग. दि. माडगूळकर यांचे नातू सुमित्र माडगूळकर हे म्हणाले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84