पुणे, दि. 2 जानेवारी 2023
(चेकमेट टाईम्स): मालकी हक्काची जमीन नाही, तसेच ज्यांची जमीन आहे,
त्यांची परवानगीही घेतली नाही. मात्र, परस्पर
त्यांच्या जागेत रस्ता दाखवून महापालिकेकडून बांधकाम आराखडे मंजूर करून घेतला
असल्याचा प्रकार समोर आला आहे.
धायरी येथील आनंद पोकळे यांनी या संदर्भात तक्रार दिली
आहे. पोकळे यांची धायरी येथे सर्व्हे नंबर ११७/१ ब ही वडिलोपार्जित १३ गुंठे जागा
आहे. आनंद पोकळे यांची परवानगी न घेता परस्पर त्यांच्या जागेतून पोहच रस्ता दाखवून
एका बांधकाम व्यावसायिकाने महापालिकेची फसवणूक करून बांधकाम नकाशे मंजूर करून
घेतले आहे.
संबंधित जमिनी मालकाच्या तक्रारीवरून या प्रकरणी पोलिसांनी
गुन्हा दाखल केला आहे. परंतु महापालिका आयुक्तांनी यांची गंभीर दखल घेत चौकशीचे
आदेश दिल्यानंतरही बांधकाम खात्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याबाबत आश्चर्य
व्यक्त केले जात आहे. ही बाब महापालिकेच्या निदर्शनास वारंवार आणून देखील
बांधकाम खात्याकडून संबंधित व्यावसायिकावर कोणताही कारवाई करण्यात येत नसल्याचे
पोकळे यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘‘या प्रकरणी फसवणूक केल्याबद्दल दोन महिन्यांपूर्वी
सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच महापालिका आयुक्तांना भेटून सर्व
परिस्थीती निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश
दिले आहेत. त्यावर बांधकाम खात्याने सुनावणी देखील घेतली आहे. मात्र, संबंधित बांधकाम व्यावसायिकावर महापालिकेकडून कोणीही कारवाई अद्याप
करण्यात आलेली नाही. तसेच मंजूर बांधकाम नकाशे देखील रद्द केलेले नाही.’’
याबाबत पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार
म्हणाले,”या संदर्भातील तक्रार माझ्याकडे आली होती. मी चौकशीचे आदेश दिले आहेत.
त्यावर पुढे काय कारवाई झाली, त्यांची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल.”
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84