पुणे, दि. 2 जानेवारी 2023
(चेकमेट टाईम्स): शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार
प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार अनिल शिवाजीराव भोसले यांचा वैद्यकीय उपचारासाठी
केलेला तात्पुरता जामिनाचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
आमदार भोसले यांनी किडनीच्या आजाराचे उपचार ससून
रुग्णालयात उपलब्ध नाहीत ते केवळ रुबी हॉल व पूना हॉस्पिटलमध्ये होत असल्याने हे
उपचार करून घेण्यासाठी तात्पुरता जामीन देण्यासाठी अर्ज केला होता. त्याला
गुंतवणूकदारांचे वकील सागर कोठारी व सरकारी वकील विलास पठारे यांनी विरोध केला. आरोपी
भोसले हे नियमानुसार सरकारी किंवा खासगी रुग्णालयात उपचार घेऊ शकतात, असा युक्तिवाद ॲड.
विलास पठारे यांनी केला.
याप्रकरणात भोसले यांची पत्नी रेश्मा भोसले या आरोपी असून
त्या अजून फरार आहेत. तसेच इतर १२ आरोपींना अद्याप अटक झाली नाही. ॲड. विलास
पाठरेंचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. विशेष
न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. हिवसे यांनी हा निर्णय दिला.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84