पुणे, दि. 19 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): “बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अखेर जवळपास दीड वर्षांनी गजाआड करण्यात वारजे पोलिसांना यश आले आहे.”
नकुल
शाम खाडे असे पकडण्यात आलेल्या फरारी आरोपीचे नाव असून, वारजे पोलीस खाडे याच्याशी संबंधीत मित्र आणि नातेवाईकांच्या
हालचालींवर सुमारे तीन महिन्यापासून पाळत ठेवत होते. यामध्ये खाडे हा त्याच्या
पत्नीस अधून मधून भेटण्यास येवून जात असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान
वारजे पोलिसांना खबऱ्याकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, चांदणी चौकात लावलेल्या सापळ्यात खाडे अलगद अडकला.
यावेळी
चारही बाजूने घेराव घातलेल्या पोलिसांनी खाडे याला शरण येण्याचा इशारा केला. मात्र
तो तेथे न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच वारजे पोलिसांनी त्याचा
पाठलाग करुन शिताफीने पकडले. यावेळी त्याला ताब्यात घेऊन वारजे माळवाडी पोलीस
स्टेशन मध्ये आणून चौकशी केली असता, त्याने बांधकाम व्यावसायिकावर आपणच हल्ला केल्याची कबुली दिली. तर चांदणी
चौकात तो त्याच्या पत्नीला भेटण्यास आला होता, अशीही माहिती
समोर आली आहे.
बांधकाम
व्यावसायिकावर गोळीबार केल्याप्रकरणी यापूर्वी चेतन
पवार, अभिजित येळवंडे आणि उमेश चिकणे यांना वेगवेगळ्या
ठिकाणावरून अटक करण्यात आली होती. तर नकुल खाडे पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र
पोलिसांनी पद्धतशीर पाळत ठेऊन, तब्बल दीड
वर्षांनी नकुल खाडे याला गजाआड करण्यात यश मिळवले. या टोळीने बांधकाम व्यावसायिकावर 5 जून 2021 ला डुक्कर खिंडीजवळ असलेल्या त्यांच्या कार्यालयाजवळ गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते या गोळीबारातून बचावले
होते.
सदरची
कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम
प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, परिमंडळ 3 चे पोलीस उप-आयुक्त सुहेल शर्मा, कोथरुड विभाग सहायक पोलीस आयुक्त रुक्मीणी गलांडे, यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस
निरीक्षक दगडू हाके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, रामेश्वर पारवे, पोलीस हवालदार
रामदास गोणते, पोलीस नाईक प्रदीप शेलार, अमोल राऊत, गोविंद फड, हनमंत मासाळ, पोलीस शिपाई
बंटी मोरे, विजय भूरूक, नितीन कातुर्डे, अजय कामठे, श्रीकांत भांगरे, गोविंद कपाटे यांनी केली.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल
मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84