Type Here to Get Search Results !

औद्योगिक वसाहतीत पिस्तुल घेऊन फिरत असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या

 

पुणे, दि. 7 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): रामटेकडी येथील औद्योगीक क्षेत्रात संशयीतरित्या फिरत असलेल्या सराईत गुन्हेगाराला वानवडी पोलिसांनी अटक केली.

वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अमजद पठाण व संतोष नाईक यांना एक सराईत गुन्हेगार रामटेकडी येथील औद्योगीक परिसरात संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली.

गुफ्या उर्फ मतीन खान (रा. गुलाबी बिल्डींग, सय्यदनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

त्याला लागलीच ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याबाबत त्याच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर यापूर्वी चोरी, दरोडा, हत्यार बाळगल्याचे वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

पोलीस निरीक्षक संदिप शिवले, सहाय निरीक्षक जयवंत जाधव, उपनिरीक्षक अजय भोसले, अंमलदार विनोद भंडलकर, महेश गाढवे, राहुल गोसावी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com 

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.