Type Here to Get Search Results !

सिंहगड रोडवरील त्या तोडफोडीच्या मुख्य सूत्रधाराला बीड मधून अटक

 


पुणे, दि. 3 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): सिंहगड कॅम्पसमध्ये मद्यधुंद अवस्थेत कोयत्याने दहशत माजवित पादचारी नागरिकांवर वार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या म्होरक्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी बीडमधून अटक केली आहे.

 

हल्ल्याचा थरार 28 डिसेंबरला रात्री दहाच्या सुमारास घडला होता. याप्रकरणी दोन धाडसी अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेऊन एका आरोपीला पोलीसी खाक्या दाखवित त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. पोलिसांच्या या कार्याचे कौतुक सामाजिक माध्यमांसह सगळीकडे करण्यात आले.

 

ही कामगिरी उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धिरज गुप्ता, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, राहुल तांबे यांनी केली.

 

करण अर्जुन दळवी (वय 21 रा. माणिकबाग, सिंहगड रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अथर्व सुनिल लाडके (वय 20 रा. सिंहगड रोड आंबेगाव बुद्रक) यांनी फिर्याद दिली आहे. अर्थव हे 28 डिसेंबरला मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी करण आणि त्याचा साथीदार सुजित गायकवाड याने परिसरात कोयत्याने दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. हातातील कोयता हवेत फिरवत पादचार्यांना धाक दाखवत दुकानांच्या शटरवर मारून राडा घातला. आरोपींनी गाड्यांवर कोयता मारुन दहशत निर्माण केल्याने लोकांनी दुकाने बंद केली. त्यानंतर आरोपींनी अर्थववर वार करून मित्र तन्मय ठोंबरे याच्या पाठीवर कोयता फेकून मारला होता.

 

याप्रकरणी घटनेची माहिती मिळताच सिंहगड ठाण्याच्या दोन हवलदारांनी धाव घेत एकाला ताब्यात घेत त्याला भर रस्त्यात चोप दिला होता. पोलीस आल्याचे पाहताच आरोपी करण पसार झाला होता. या घटनेनंतर सामाजिक माध्यमांवरही बातमी वार्‍यासारखी पसरली.

 

याच दरम्यान आरोपीने पुणे सोडून थेट बीड गाठले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस त्याचा तपास घेत असतांना तो बीडमध्ये लपून बसल्याची माहिती पोलीस अंमलदार हर्षल शिंदे आणि धनाजी धोत्रे यांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक धीरज गुप्ता, हर्षल शिंदे, सचिन गाडे यांच्या पथकाने बीडमध्ये जाउन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes  

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/  

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes  

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n  

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes     

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.