Type Here to Get Search Results !

उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत १ लाखाची खंडणी उकळताना दोघांना रंगेहाथ पकडले


पुणे, दि. 30 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): बेकायदेशीर माथाडी व विविध संघटनांकडून बेकायदशीररित्या व्यावसायिकांना त्रास दिला जात आहे. याची दखल घेत पोलीस आयुक्त रितेश कुमार (Pune CP Ritesh Kumar) यांनी व्यावसायिकांशी संवाद साधत निर्भयपणे तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते.

 

यावेळी वारजे (Warje Malwadi) येथील हॉटेल व्यावसायिक यांनी खंडणीसाठी धमकावणाऱ्या आरोपींबाबत तक्रार दिल्याने त्यांचेवर खंडणी विरोधी पथक-2 (Anti Extortion cell-2) कडून सापळा (trap) कारवाई करण्यात आली. यावेळी 1 लाखाची खंडणी उकळताना आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले.

 

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुकेश शेखर शेट्टी (Sukesh Shekhar Shetty) यांचे वारजे माळवाडी येथे क्राऊड-9 (Crowd-9) या नावाने हॉटेल आहे. व्यावसायिक शेट्टी यांना आरोपी सुभाष सहजराव (Subhash Sahajrao) व बाळासाहेब लोणारे (Balasaheb Lonare) यांनी 2 लाख (2 Lakh ruppes demand) रूपयांची खंडणी मागितली होती. सदर खंडणीबाबत फिर्यादी सुकेश शेट्टी यांनी खंडणी विरोधी पथक-2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर (Sr. PI Pratap Mankar) यांचेकडे तक्रार अर्ज (Complaint Application) दाखल केला होता. सदर तक्रारी अर्जावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सूचनेनूसार कारवाई करण्यात आली.

 

यावेळी खंडणी विरोधी पथक-2 चे सपोनि चांगदेव सजगणे (API Changdev Sajagane) व उपनि मोहनदास जाधव (PSI Mohandas Jadhav) यांची पथके तयार करून सापळा कारवाई केली असता आरोपी सुभाष अशोक सहजराव व बाळासाहेब हरिभाऊ लोणारे यांना एक लाख रूपयांची खंडणी घेताना शिवणे (shivane) येथे रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत उत्तमनगर (uttamnagar) पोलीस ठाण्यात गुरनं. 09/2023 भादवि कलम 386, 387, 34 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

सदर कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, गुन्हे उपायुक्त अमोल झेंडे, सहा. पो. आयुक्त नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-2 वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सपोनि चांगदेव सजगणे, उपनि मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण व पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे, अनिल मेंगडे, राहुल उत्तरकर, ईश्वर आंधळे, सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, चेतन आपटे, चेतन शिरोळकर, पवन भोसले, किशोर बर्गे, प्रदिप गाडे, आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांनी केली आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.