Type Here to Get Search Results !

हिंदू राष्ट्रसेनेच्या धनंजय देसाई यांच्यासह २० जणांची मोहसीन शेख हत्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता

 

पुणे, दि. 27 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यातील मोहसीन शेख (Mohasin shaikh) हत्येप्रकरणातील आरोपी हिंदू राष्ट्रसेनेचा (hindu rashtrasena) अध्यक्ष धनंजय देसाईंसह (dhananjay desai) सर्व 20 आरोपींची निर्दोष मुक्तता (bail) करण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायालयाने (court) सबळ पुराव्या अभावी (lack of evidence) निर्दोष मुक्तता (acquitted) केली आहे.

 

2014 मध्ये आक्षेपार्ह पोस्टमुळे (offensive post) पुण्यात तणाव निर्माण झालेला होता. 2 जून 2014 ला पुण्यातील हडपसर (Hadapsar) परिसरात आयटी क्षेत्रात अभियंता असलेला मोहसीन शेखची हत्या (murder) करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाईंसह 20 जणांना येरवड्यातून अटक केली होती. 

छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thakrey) यांचे काही आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर (facebook) टाकल्यामुळे 2 जून 2014 मध्ये हडपसर मध्ये दंगल (Riot) झाली होती. त्यावेळी हिंदू राष्ट्र सेनेने तोडफोड केली होती. याचवेळी मोहसिनला त्याची दाढी आणि पेहराव वरुन त्यांनी हटकलं आणि त्याला मारहाण केली ज्यात त्याचा मृत्यू झाला होता.

सोलापूरमधील (solapur) काही तरुणांनी 'जस्टिस फॉर मोहसिन' (jutice for mohasin) ही चळवळ (movement) देखील सुरू केली होती. या प्रकरणी पोलिसांनी हिंदू राष्ट्रसेनेच्या धनंजय देसाई यांच्यासह 23 जणांच्या विरोधात आरोपपत्र (charge sheet) दाखल केले होते. त्यानंतर 2019 मध्ये धनंजय देसाई यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) जामीन मंजूर (Bail granted) केला होता.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes       

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.