पुणे, दि. 9 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): गांजा तस्करी प्रकरणात मागील एक वर्षापासून फरार असलेल्या नगर जिल्ह्यातील केडगावमधील ग्रामसेवकाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. किशोर किसनराव जेजुरकर (रा. केडगाव, लोंढेमळा, नगर) असे आरोपीचे नाव आहे.
गेल्या वर्षी (फेब्रुवारी 2022) मध्ये अंमली पदार्थविरोधी पथक 1 ने शहरातील नगर रस्त्यावर कैलास साहेबराव पवार (वय 35, रा. गडदे वस्ती, वाडेबोल्हाई रस्ता, ता. हवेली) याला अटक केली होती. त्याच्याकडून 128 किलो 765 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
पवार याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने जेजुरकर याच्याकडून गांजा विक्रीस आणल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अंमली पदार्थविरोधी पथकाकडून जेजुरकरचा शोध घेण्यात येत होता. जेजुरकरच्या घरी पोलिसांचे पथक गेले होते. मात्र, तो सापडला नव्हता. त्यानंतर जेजुरकर हा ग्रामसेवक असल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी पारनेर पंचायत समितीकडे याची माहिती दिली.
गुन्हे शाखेचे उपपोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थविरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, मनोज साळुंके, विशाल शिंदे, विशाल दळवी, मारुती पारधी, ज्ञानेश्वर घोरपडे आदींनी ही कारवाई केली.
त्यानंतर जेजुरकर याला सेवेतून निलंबित करण्यात आले होते, तेव्हापासून तो पोलिसांपासून पळत होता. या दरम्यान जेजुरकर हा केडगाव येथे आल्याची माहिती अंमली पदार्थविरोधी पथकातील पोलीस अंमलदार योगेश मोहिते यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने जेजुरकरच्या घराजवळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. संबंधित ग्रामसेवकाला गतवर्षीच सेवेतून निलंबित करण्यात आले होते, तेव्हापासून तो फरार झाला होता. अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84